धुरंधरचा नायक आणि प्रत्यक्षातील महानायक, हिझबुलमध्ये घुसखोरी करून दोन दहशतवाद्यांचा खात्मा करणारे शूरवीर मेजर मोहित शर्मा

विशेष प्रतिनिधी

मुंबई; भारताच्या लष्कराचा एक पराक्रमी, अदम्य आणि गुप्त मोहिमांचे प्रतीक असलेले म्हणजे मेजर मोहित शर्मा. २१ मार्च २००९ रोजी कुपवाडा येथे दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान त्यांनी प्राणांची आहुती दिली आणि त्यांच्या शौर्याने संपूर्ण देशाचे मस्तक अभिमानाने उंचावले.धुरंधर चित्रपटातील नायकाचे पात्र मेजर मोहित शर्मा यांच्या जीवनावर आधारित असल्याची चर्चा आहे. Mohit Sharma

धुरंधर चित्रपटाचा नायक मेजर शर्मा यांच्यावर आधारित आहे असा समज झाल्याने त्यांचे कुटुंब दिल्ली हायकोर्टात गेले. मात्र निर्माते आदित्य धर यांनी अधिकृत स्पष्टीकरण देत चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित नसल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यामुळे मेजर मोहित शर्मा यांच्या देदीप्यमान कारकिर्दीची आठवण पुन्हा ताजी झाली आहे.

मोहित शर्मा यांचा जन्म १९७८ मध्ये हरियाणातील रोहतक येथे झाला. अभ्यासात तेजस्वी, अनेक वाद्ये वाजवणारे, उत्कृष्ट गायक आणि बहुआयामी प्रतिभेचे धनी असलेले मोहित पुढे अभियांत्रिकी सोडून १९९५ मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए NDA,) दाखल झाले. १९९९ मध्ये ते 5th Madras Regimentमध्ये नियुक्त झाले.यानंतर काश्मीरमधील 38 Rashtriya Riflesमध्ये कामगिरी करताना 2002 मध्ये COAS Commendation Card मिळाला. विशेष दलात जाण्याची इच्छा पूर्ण करत 2003 मध्ये ते 1 Para Special Forcesमध्ये दाखल झाले आणि 2004 मध्ये त्यांना सेना पदक मिळाले.

भारतीय लष्कराच्या इतिहासातील सर्वात धाडसी गुप्त मोहिमांपैकी एक 2004 मध्ये पार पडली. मोहित शर्मा यांनी स्वतःची पूर्ण ओळख बदलून, केस वाढवून, दाढी ठेवून ‘इफ्तिखार भट’ हे नाव धारण केले आणि हिझबुल मुजाहिदीनमध्ये यशस्वीरित्या घुसखोरी केली.
दोन कुख्यात दहशतवादी अबू तोरारा आणि अबू सब्झार यांना त्यांनी जवळ केले. स्वतःच्या भावाच्या मृत्यूचा खोटा बदला घेण्यासाठी मदत हवी आहे असे सांगत त्यांनी दोघांचा विश्वास संपादन केला. दहशतवाद्यांनी त्यांना ग्रेनेड आणि मदत पुरवली. योग्य संधी साधत मेजर शर्मा यांनी दोघांचा जागेवरच खात्मा केला.ही मोहीम भारतीय लष्कराच्या इतिहासात अतुलनीय धैर्याचे उदाहरण म्हणून ओळखली जाते.

2009 मध्ये कुपवाड्यातील कारवाईदरम्यान त्यांनी दोन दहशतवाद्यांना संपवले आणि सहकाऱ्यांचे प्राण वाचवले. मात्र छातीत गोळी लागून ते वीरमरण पावले. त्यांना देशाचा सर्वोच्च शांतकाळातील शौर्य पुरस्कार अशोक चक्र मरणोत्तर देण्यात आला.

मेजर मोहित शर्मा हे केवळ सैनिक नव्हते तर धैर्य, बुद्धिमत्ता, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे जिवंत प्रतीक होते. हिझबुलमध्ये घुसखोरी करून केलेली कारवाई आजही भारतीय सैन्याच्या इतिहासातील सर्वात अद्वितीय पराक्रमांपैकी एक मानली जाते.

Hero Beyond Dhurandhar, Major Mohit Sharma Who Infiltrated Hizbul and Took Down Two Terrorists

महत्वाच्या बातम्या