संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले भारतीय सैन्याने ठरविले असते तर ..

विशेष प्रतिनिधी

लडाख : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दाखवलेली शिस्त, समन्वय आणि संयम अभूतपूर्व होता. आपल्या जवानांनी हवे असते तर यापेक्षा खूप अधिक कारवाई केली असती, पण त्यांनी आवश्यक तेवढीच कारवाई करून परिपक्वतेचा आदर्श ठेवला,” असे कौतुक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. Rajnath Singh

लडाखमध्ये आयोजित कार्यक्रमात राजनाथ सिंह त्यांनी सीमा रस्ते संघटनेच्या (BRO) देशभरातील विविध भागात पूर्ण झालेल्या १२५ सीमावर्ती पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन केले. Rajnath Singh



२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जण ठार झाले होते. त्यानंतर ७ मे रोजी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील दहशतवादी तळांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करत ऑपरेशन सिंदूर राबवले.राजनाथ सिंह म्हणाले, “जगाने पाहिले की आपल्या सैन्याने दहशतवाद्यांचा कसा नायनाट केला. पराक्रमासोबत त्यांनी जबाबदारीही दाखवली.”

ऑपरेशन सिंदूरच्या यशामध्ये सैन्य, स्थानिक प्रशासन आणि सीमाभागातील नागरिक यांच्या समन्वयाचा मोठा वाटा असल्याचेही सिंह यांनी सांगितले. “लडाखसह सीमावर्ती भागातील जनतेने आमच्या कारवाईला पाठिंबा दिला. त्यामुळे जवानांमध्ये आत्मविश्वास वाढला,” असे त्यांनी नमूद केले.

संरक्षण म्हणाले की, रस्ते, संपर्क जाळे, उपग्रह सुविधा आणि सतत उपलब्ध असलेला पुरवठा यामुळे भारतीय सैन्य कठीण पर्वतीय भागातही प्रभावीपणे काम करू शकले. सीमेवर तैनात असलेल्या प्रत्येक सैनिकासाठी एक सेकंदही महत्त्वाचा असतो. योग्य संपर्क आणि वेळी मिळणारा पुरवठा हा राष्ट्रीय सुरक्षेचा कणा आहे,” असे सिंह यांनी सांगितले.

सिंह यांनी सांगितले की केंद्र सरकार, सशस्त्र सेना आणि BRO मिळून सीमावर्ती भागातील सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करत राहतील. “सीमा भागात सेना आणि स्थानिक नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक मजबूत करणे अत्यावश्यक आहे. कोणतीही बाह्य शक्ती हे नाते कधीही कमकुवत करू शकणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Defence Minister Rajnath Singh said that if the Indian Army had decided…

महत्वाच्या बातम्या