Priyanka Gandhi : संसदेत ‘वंदे मातरम्’वर वादळी चर्चा; प्रियंका गांधींचा मोदींवर थेट निशाणा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Priyanka Gandhi  लोकसभेत सोमवारी ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त झालेली विशेष चर्चा तीव्र राजकीय शाब्दिक चकमकीत परिवर्तित झाली. या चर्चेदरम्यान कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट प्रहार करत म्हटले की, “हे गाणे १५० वर्षांपासून देशाच्या आत्म्याचा भाग आहे. मग आज अचानक चर्चा का? कारण मोदीजी, बंगालची निवडणूक येत आहे.”Priyanka Gandhi

प्रियंका म्हणाल्या की, “सरकार स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांवर नवीन आरोप लावू इच्छिते. मोदीजी आता पूर्वीसारखे पंतप्रधान राहिले नाहीत.”Priyanka Gandhi

चर्चा सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले,

“काँग्रेसने वंदे मातरम् चे तुकडे केले. नेहरू जिनांसमोर नतमस्तक झाले. स्वातंत्र्याच्या काळात हे गीत प्रेरणेचे स्रोत होते, मग गेल्या दशकात त्याच्यावर अन्याय का झाला?”



पंतप्रधान म्हणाले, “जेव्हा वंदे मातरमला 50 वर्षे झाली होती, तेव्हा देशाला गुलामगिरीत जगणं भाग पडलं होतं. जेव्हा त्याला 100 वर्षे झाली, तेव्हा देश आणीबाणीच्या साखळदंडात अडकला होता. तेव्हा भारताच्या संविधानाचा गळा दाबण्यात आला होता.”याची 150 वर्षांनिमित्त त्या महान अध्यायाला, त्या वैभवात परत आणण्याची संधी आहे.1857 च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटीश साम्राज्य अशांत असताना हे गीत लिहिलं होतं. भारतावर खूप दबाव होता. अनेक प्रकारचे अत्याचार होत होते, भारतीय लोकांची इंग्रजांकडून अडवणूक सुरू होती.

पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेतील भाषणात नेहरूंचाही उल्लेख केला. ते म्हणाले , “वंदे मातरमला मुस्लीम लीगचा विरोध वाढत चालला होता. 15 ऑक्टोबर 1937 रोजी लखनौमधून मोहम्मद अली जिना यांनी वंदे मातरमच्या विरोधात घोषणाबाजी केली. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष जवाहरलाल नेहरूंना वाटलं की, त्यांचं स्थान धोक्यात आलं आहे. मुस्लीम लीगच्या निराधार दाव्यांना जोरदार प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांनी वंदे मातरमचीच चौकशी सुरू केली.”

“20 ऑक्टोबरला जिनांनी केलेल्या विरोधानंतर 5 दिवसांनी नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात नेहरूंनी जिनांच्या भावनांशी सहमती दर्शवली आणि म्हटलं की, वंदे मातरमची आनंद मठाची पार्श्वभूमी मुस्लिमांना भडकावू शकते. मी नेहरूंचं विधान वाचलंय. नेहरू म्हणाले की, मी वंदे मातरम गीताची पार्श्वभूमी वाचली आहे. त्यानंतर नेहरूंनी लिहिलं की, मला वाटतं की या पार्श्वभूमीमुळे मुस्लीम भडकतील.”

भाजप नेते अनुराग ठाकूर म्हणाले,

“काही लोकांना वंदे मातरम् ची अ‍ॅलर्जी आहे. आता जिनांच्या मुलालाही या गीताची समस्या आहे.”

सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, “जे गाणे स्वातंत्र्य चळवळीला एकत्र आणत होते तेच गाणे आता काही जण देश फोडण्यासाठी वापरतात. वंदे मातरम् गाण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे.”

Storm Erupts in Parliament as Priyanka Gandhi Targets PM Modi Over ‘Vande Mataram’ Debate

महत्वाच्या बातम्या