Padalkar–Awhad : पडळकर – आव्हाड राड्यात कार्यकर्त्यांना शिक्षा, समितीने केली कारवाईची शिफारस

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Padalkar–Awhad  विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानभवनाच्या लॉबीत झालेल्या राड्याची चौकशी करणाऱ्या समितीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना 2 दिवसांच्या दिवाणी कारावासाच्या शिक्षेची शिफारस केली आहे.Padalkar–Awhad

जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख व गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते सर्जेराव टकले यांच्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वाद झाला होता. हे दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. विधानसभा व विधानपरिषदेच्या अध्यक्ष तथा सभापतींनी या घटनेच्या चौकशीसाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांची समिती नियुक्त केली होती. त्यांच्या समितीने आज आपला अहवाल विधानसभेच्या पटलावर सादर केला.Padalkar–Awhad

नरेंद्र भोंडेकर आपला अहवाल सादर करताना म्हणाले, 17 जुलै 2025 रोजी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू होती. तेव्हा जितेंद्र आव्हाड यांचे अभ्यंगत नितीन हिंदुराव देशमुख व आमदार गोपीचंद पडळकर यांचे अभ्यंगत सर्जेराव बबन टकले यांनी विधानभवन मुंबई येथे आपसात धक्काबुक्की करत अत्यंत आक्षेपार्ह कृत्य करून महाराष्ट्र विधानसभेची प्रतिष्ठा व प्रतिमा मलीन केली. विधानसभेच्या विशेषाधिकार भंग व अवमाननेच्या प्रकरणाशी संबंधित समिती या प्रकरणी आपला अहवाल सादर करत आहे. समितीने या प्रकरणी 10 बैठका घेतल्या. त्यात नितीन देशमुख व सर्जेराव टकले यांची साक्षीपुरावे नोंदवले.Padalkar–Awhad



विधानभवनासारख्या प्रतिबंधित क्षेत्रात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अभ्यंगतांना विनापडताळणी प्रवेशपत्रिका देऊ नये. विधानभवनात येणाऱ्या सर्वच अभ्यंगतांची सुरक्षा तज्ज्ञ व सल्लागाराच्या अभिप्रायानुसार एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात यावी. अशा नियमावलीची काटेकोरपणे पालन करावे अशी समितीची शिफारस आहे. असे प्रकार रोखण्यासाठी किंबहुना अशा घटना घडूच नये म्हणून सुरक्षा सल्लागार, तसेच पोलिस विभागाशी समन्वय ठेवून प्रभावी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात यावी.

विधानभवन इमारतीमध्ये प्रवेशिका वितरण प्रणाली ही महाराष्ट्र पोलिस डेटाबेससोबत संलग्नित करून त्याद्वारे अभ्यंगतांची स्वयंचलित रियलटाईम पार्श्वभूमी तपासणी प्रणाली कार्यान्वित करण्यात यावी. त्यात अभ्यंगताची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे दिसून आल्यास त्या अभ्यंगतांची प्रवेशिका विनंती तत्काळ नाकारली जाईल. अशी प्रणाली तैनात करण्याची शिफारस ही समिती करत आहे, असे भोंडेकर म्हणाले.

या गंभीर कृत्यासाठी दंडात्मक कारवाई म्हणून नितीन देशमुख व सर्जेराव टकले यांना 2 दिवसांची दिवाणी कारावासाची शिक्षा देण्यात यावी, तसेच त्यांना विधानभवनाच्या मुंबई व नागपूर येथील आवारात येण्यास या विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत म्हणजेच 2029 पर्यंत बंदी घालण्यात यावी अशी शिफारस ही समिती करत आहे, असे आमदार भोंडेकर म्हणाले.

Padalkar–Awhad Clash: Committee Recommends Action and Punishment for Party Workers

महत्वाच्या बातम्या