विशेष प्रतिनिधी
नागपूर. Tukaram Mundhe राज्यातील चर्चेत राहणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावरील राजकीय तणाव आणखी चिघळला आहे. त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसने आज विधानभवनावर भव्य मोर्चा काढत भाजप आमदारांनी केलेल्या निलंबन मागणीला जोरदार विरोध दर्शवला.Tukaram Mundhe
मोर्चादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंढे यांचे मोठ्या आकाराचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. इतकेच नव्हे तर त्यांच्या फोटोचा दुग्धाभिषेक करत त्यांना “प्रामाणिक अधिकारी” आणि “भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे योद्धा” म्हणून गौरवण्यात आले.Tukaram Mundhe
काँग्रेस नेत्यांनी भाजपवरआरोप करत म्हटले की, “तुकाराम मुंढे यांनी अनेक घोटाळ्यांवर कारवाई केली, त्यामुळेच त्यांना लक्ष्य केले जात आहे. मुढे यांची पारदर्शकता, कडक शिस्त आणि भ्रष्टाचारविरोधी निर्णयांची मालिका लोकांना स्पष्टपणे दिसते. त्यामुळे त्यांच्यावर होणारी कारवाई ही अधिकाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न” आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी मुंढे यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून, विधिमंडळात त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विधीमंडळाच्या सदस्याला धमकी येणं ही गंभीर बाब आहे,’ असे सांगत सविस्तर माहिती घेऊन सभागृहात निवेदन करण्याचं आश्वासन दिले होते.
भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विशेष लक्षवेधी सूचना मांडत तुकाराम मुंढे यांना लक्ष्य केले. आमदार खोपडे यांनी गंभीर आरोप केला की, त्यांनी मुंढे यांच्या कथित गैरव्यवहारांविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना फोनवरून धमक्या येऊ लागल्या.
‘या धमक्यांमुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे,’ असा दावा आमदार खोपडे यांनी विधानसभेत केला. सभागृहात या विषयावर बोलणार असल्याची चर्चा बाहेर होताच धमकीचे फोन आले, असे त्यांचे म्हणणे आहे. या धमक्यांमध्ये ‘तुकाराम मुंढे यांच्याविरोधात बोलू नका, नाहीतर गंभीर परिणाम होतील,’ असा इशारा देण्यात आल्याचे खोपडे यांनी सांगितले आणि त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल केल्याची माहिती दिली.
आमदार कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर नागपूर महापालिकेतील कारभारासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, मुंढे 2020 मध्ये नागपूर महापालिकेत रुजू झाले आणि केवळ 7 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी मनमानी कारभार केला. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचे अधिकार नसतानाही त्यांनी स्वतःचे अधिकार वापरले. तसेच, कोणतीही योग्य मान्यता नसताना ठराविक कंत्राटदारांना धनादेश वितरित केले.
खोपडे यांनी त्यावेळी या गैरव्यवहारांचे पुरावे सादर करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचेही सांगितले. एवढेच नाही, तर स्मार्ट सिटीच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी धनादेशांवर सही करण्यास नकार दिल्याने मुंढे यांनी त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोपही त्यांनी केला. यापूर्वी, अनिल देशमुख यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचेही खोपडे म्हणाले.
Congress Marches to Vidhan Bhavan in Support of Tukaram Mundhe, Slams BJP’s Suspension Demand
महत्वाच्या बातम्या
- राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवण्यासाठी काँग्रेस आक्रमक, नाना पटोले मांडणार ठराव
- Padalkar–Awhad : पडळकर – आव्हाड राड्यात कार्यकर्त्यांना शिक्षा, समितीने केली कारवाईची शिफारस
- चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का
- निवडणूक 20 दिवस पुढे ढकलून निकाल फिरवण्याचे काम, विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर आरोप