R. Sreelekha : केरळमधील भाजपची नवी आशा, आयपीएस अधिकारी आर. श्रीलेखा होणार तिरुवनंतपुरमच्या महापौर

विशेष प्रतिनिधी

तिरुवनंतपुरम : R. Sreelekha केरळच्या माजी डीजीपी आणि राज्यातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आर. श्रीलेखा यांच्या भाजपमधील प्रवेशानंतर काही महिन्यांतच पक्षाला मोठा राजकीय फायदा झाल्याचे दिसत आहे. कठोर प्रतिमा, सामाजिक काम आणि प्रशासकीय अनुभवामुळे भाजपला स्थानिक पातळीवर विश्वासार्हता मिळाल्याचे मानले जात आहे. केरळच्या राजकारणात ऐतिहासिक बदल घडवत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएने तिरुवनंतपुरम महानगरपालिकेवर तब्बल 45 वर्षांनी कब्जा केला आहे. R. Sreelekha

पारंपरिकरित्या डाव्यांचा मजबूत गड मानल्या जाणाऱ्या या महानगरपालिकेत एनडीएने 101 पैकी तब्बल 50 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. सत्ताधारी एलडीएफ 29 जागांवर घसरला, तर कॉंग्रेसच्या यूडीएफकडे 19 जागा गेल्या. या निकालामुळे तिरुवनंतपुरमचा राजकीय नकाशा अक्षरश: उलथापालथ झाला आहे. विशेष म्हणजे हा कॉंग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांचा बालेकिल्ला मानला जातो. R. Sreelekha



सस्मंगळम विभागातून विजय मिळवलेल्या श्रीलेखा यांना तिरुवनंतपुरमच्या महापौरपदी बसवले जाण्याची जोरदार शक्यता व्यक्त केली जात आहे.

आर. श्रीलेखा 1987 बॅचच्या आयपीएस अधिकारी आणि केरळच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. तिरुवनंतपुरम येथे त्यांचा जन्म झाला. आयपीएसमध्ये येण्याआधी कॉलेजमध्ये लेक्चरर आणि बँक अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. केरळातील अनेक जिल्ह्यांमध्ये एसपी, डीआयजी, आयजी पदांवर सेवा बजावली. सीबीआयमध्ये प्रतिनियुक्तीवर चार वर्षे काम करताना त्यांनी अनेक मोठ्या छापेमारी मोहीमा केल्या. त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे त्यांना ‘रेड श्रीलेखा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मार्च 2023 मध्ये अग्निशमन आणि बचाव सेवांच्या महानिदेशक पदावरून त्यांनी निवृत्ती घेतली.

त्यांनी कवितासंग्रह आणि क्राइम थ्रिलर यांसह नऊ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचा स्वतःचा यूट्यूब चॅनेलही आहे.

भाजपा प्रवेशावेळी श्रीलेखा म्हणाल्या होत्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने त्यांना प्रेरित केले. “मी तीन आठवडे विचार करून निर्णय घेतला. लोकसेवा करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे,” होता आणि निवडणूक लढवली होती.

Kerala BJP’s New Rising Star, IPS Officer R. Sreelekha Set to Become Thiruvananthapuram Mayor

महत्वाच्या बातम्या