विशेष प्रतिनिधी
मुंबई : विमानतळाच्या फनेल झोनमुळे वर्षानुवर्षे अडकलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना अखेर गती मिळणार आहे. विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या पुनर्विकास योजनेची घोषणा केली. या निर्णयामुळे मुंबईतील हजारो जर्जर इमारतींचा पुनर्विकास पुन्हा मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई विमानतळाजवळील इमारतींना तांत्रिक अडथळे, फनेल झोन मर्यादा आणि कमी वापरता येणारे चटई क्षेत्र यामुळे पुनर्विकास करणे व्यवहार्य ठरत नव्हते. हीच अडचण दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे उपक्रमाअंतर्गत राज्य शासनाने विशेष पुनर्विकास योजना तयार केली आहे.
नवीन योजनेतील प्रमुख तरतुदी सर्व पुनर्विकासयोग्य इमारतींना नवी संधी, तांत्रिक अडथळे काढून टाकण्याचा निर्णय. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ३०० चौ. फुटापर्यंतचे घर विनामूल्य. अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांसाठी ६00 चौ. फुटापर्यंतची पुनर्बांधणी विनाशुल्क. जमीनमालकांना त्यांच्या मूळ मालकी हक्काच्या प्रमाणात बेसिक FSI. संरक्षित भाडेकरूंना त्यांच्या संरक्षित क्षेत्राएवढे किंवा किमान ३० चौ. मीटर घर देण्याची अट. अधिकृत रहिवाशांनाही त्यांच्या कायदेशीर ताब्यातील क्षेत्रानुसार चटई क्षेत्र मिळणार.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नव्या धोरणामुळे अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लागतील आणि रहिवाशांना सुरक्षित व आधुनिक घरे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
नवी मुंबई परिसरातील घरखरेदीदारांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. सिडकोने आपल्या सर्व घरांच्या किंमतीत १० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. (तपशील पान ३ वर.)
फनेल झोनची मर्यादा गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील पुनर्विकासाची सर्वात मोठी अडचण ठरली होती. अनेक इमारती धोकादायक स्थितीत असतानाही रहिवाशांना स्थलांतर करणे शक्य होत नव्हते. आता हा निर्णय मुंबईच्या पुनर्विकास प्रक्रियेला नव्याने गती देणारा ठरणार आहे.
Maharashtra Govt Clears Blocked Redevelopment Near Mumbai Airport, Thousands of Stalled Projects to Finally Move Ahead
महत्वाच्या बातम्या
- राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवण्यासाठी काँग्रेस आक्रमक, नाना पटोले मांडणार ठराव
- Padalkar–Awhad : पडळकर – आव्हाड राड्यात कार्यकर्त्यांना शिक्षा, समितीने केली कारवाईची शिफारस
- चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का
- निवडणूक 20 दिवस पुढे ढकलून निकाल फिरवण्याचे काम, विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर आरोप