विशेष प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्र राज्य 2030 पर्यंत देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. Devendra Fadnavis
हिवाळी अधिवेशन 2025 च्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. विरोधकांनी केलेले आरोप खोडून काढत त्यांनी अनेक बाबी सभागृहात मांडल्या आहेत. जाहीर केलेली किंवा सुरु असलेली कोणतीही योजना रद्द होणार नाही असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला त्या तत्वाने महाराष्ट्र चालत राहणार आहे. त्यामुळे आता सीबीएसईच्या नवीन पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा तसेच आपल्या मराठा साम्राज्याचा 21 पानांचा इतिहास घेतला आहे. याआधी मुघलांचा इतिहास 17 पानांचा तर मराठा साम्राज्याचा फक्त एकच परिच्छेद होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘व्हिजन डॉक्युमेंट 2047’ चा रोडमॅप सादर केला. निवडणुकांनंतरही ‘लाडकी बहीण’ सारखी कोणतीही योजना बंद होणार नाही, असे आश्वासन दिले. गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतानाच, आगामी काळातील विकासाचा रोडमॅपही मांडण्यात आला. लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकांचे महत्त्व आणि ‘अमृत महोत्सवी महाराष्ट्र’ या संकल्पनेवरही या भाषणात प्रकाश टाकण्यात आला आहे.
विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्रितपणे राज्याच्या हितासाठी काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
पुनरुच्चार करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. “106 हुतात्म्यांनी तयार केलेला महाराष्ट्र आहे. मुंबई तोडली जाईल असा विचार करू नये. निवडणूक आली की अशा टीका होतात. जो पर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही वेगळे करू शकत नाही,” असे त्यांनी ठामपणे सभागृहात सांगितले.