Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले, कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट…शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणारच

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Eknath Shinde  कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी सुनता नहीं असा डायलॉग मारत शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणारच असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.Eknath Shinde

एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, संपूर्ण अधिवेशनात विरोधकांनी विरोधी पक्षनेते पदाशिवाय दुसरी कोणतीही चर्चा केली नाही, हे दुर्देवं आहे. पण विरोधकांकडे संख्याबळ नाही ही आमची चूक नाही. तो जनतेने दिलेला कौल आहे आणि तो कौल त्यांनी स्वीकारला पाहिजे. पण काही लोक बाहेर बोलतात आणि याठिकाणी सभागृहात येऊन बोलत नाहीत. आम्हाला देखील आरोप करता येतात. मात्र, आम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलत नाहीत. अंगात नही बळ अन् चिमटा काढून पळ, अशी परिस्थिती काही लोकांची आहे. आता काही लोक आले आणि फक्त पर्यटन करून गेले. आले, फिरले आणि गेले. हे कोणी वैयक्तिक घेऊ नये. कारण मी वैयक्तिक कोणाबाबत बोलत नाही. कारण सभागृहात एकही प्रश्न न विचारणारे देखील काही सदस्य आहेत, असा टोलाही शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.Eknath Shinde



विरोधकांवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, काही लोकांनी कर्ज माफीचा विषय काढला, पण आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे. आम्ही कर्जमाफीचा शब्द महायुतीच्या जाहीरनाम्यात दिलेला आहे. त्यामुळे सगळं बरोबर होईल. कारण विरोधक म्हणाले होते की, लाडकी बहीण योजना यशस्वी होणार नाही. पण लाडकी बहीण योजना यशस्वी झाली. मात्र,

विरोधकांवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, काही लोकांनी कर्ज माफीचा विषय काढला, पण आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे. आम्ही कर्जमाफीचा शब्द महायुतीच्या जाहीरनाम्यात दिलेला आहे. त्यामुळे सगळं बरोबर होईल. कारण विरोधक म्हणाले होते की, लाडकी बहीण योजना यशस्वी होणार नाही. पण लाडकी बहीण योजना यशस्वी झाली. मात्र, सभागृहातील काही लोक तर त्या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले होते. पण त्या लोकांना न्यायालयाने चांगलीच चपराक लगावली. कारण आम्ही जे बोलतो ते करतो. “कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी सुनता नहीं.” कर्जमाफी आम्ही करणार, त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही. सर्वांनी मिळून शेतकऱ्यांच्या पाठिमागे उभं राहिलं पाहिजे. त्याबाबत राजकारण करता कामा नये. आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही म्हणालो होतो आणि आम्ही आमचा शब्द पाळला, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.

Eknath Shinde Says, Commitment Is Commitment, Farm Loan Waiver Will Definitely Be Delivered

महत्वाच्या बातम्या