विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अनेकदा राजकीय धक्का देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व कालच्या भाजपने आज नवीन धक्का दिला. देशभरात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू असताना भाजपच्या संसदीय मंडळाने 45 वर्षांच्या नितीन नवीन सिन्हा यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदावर नियुक्ती केली. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक आणखी किती काळ पुढे ढकलली जाणार याविषयी देशभरातल्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. Nitin Nabin
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त झालेले नितीन नवीन सिन्हा नेमके आहेत तरी कोण??, याचा सर्च सोशल मीडियावर सुरू झाला.
Bihar Minister Nitin Nabin appointed as the National Working President of the Bharatiya Janata Party pic.twitter.com/zvo7aUNvX9
— ANI (@ANI) December 14, 2025
– बिहारमध्ये मंत्री ते थेट राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष
नितीन नवीन सिन्हा हे बिहारच्या नितीश कुमार मंत्रिमंडळात नुकतेच मंत्री झालेत. ते भाजपचे ज्येष्ठ नेते नवीन किशोर सिन्हा यांचे पुत्र असून ते बिहारच्या बंकीपूर मधून चार वेळा विधानसभेवर निवडून आले. ते 2025 च्या निवडणुकीत पाचव्यांदा बिहार विधानसभेवर निवडून आल्यानंतर भाजपने त्यांची निवड नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात केली.
परंतु भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेवढी म्हणून नावे समोर आली, त्यामध्ये नितीन नवीन सिन्हा हे नाव अजिबातच समोर आलेले नव्हते. परंतु भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाने अचानकपणे मोठा राजकीय धक्का देत नितीन नवीन सिन्हा यांना बिहारच्या प्रादेशिक राजकारणातून बाजूला काढून थेट राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात आणले एवढेच नव्हे तर भाजप सारख्या बलाढ्य पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर नियुक्त केले. त्यामुळे देशभरातल्या राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला.
Bihar Minister Nitin Nabin appointed as the National Working President of the Bharatiya Janata Party
महत्वाच्या बातम्या
- राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवण्यासाठी काँग्रेस आक्रमक, नाना पटोले मांडणार ठराव
- Padalkar–Awhad : पडळकर – आव्हाड राड्यात कार्यकर्त्यांना शिक्षा, समितीने केली कारवाईची शिफारस
- चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का
- निवडणूक 20 दिवस पुढे ढकलून निकाल फिरवण्याचे काम, विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर आरोप