बिगुल जिल्हा परिषद की महानगरपालिकांचे? राज्य निवडणूक आयाेगाची आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य निवडणूक आयाेगाने साेमवारी दुपारी वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले असून राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर हाेण्याची शक्यता आहे. Zilla Parishad or Municipal Corporation

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घ्या, असे निर्देश सरकारला दिले आहेत. निवडणूक आयोगाने तीन टप्प्यांत या निवडणुका घेण्याचे नियाेजन केले हाेते. त्यानुसार नगर परिषदा आणि नगर पंचायत निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आणि सर्वात शेवटी मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात हाेती. त्यामुळे निवडणूक आयाेग नियाेजनाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर करताेय की जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुका एकाच वेळी हाेतील असा प्रश्न निर्माण झाला आहे.



निवडणूक आयाेगाच्या पत्रकार परिषदेनंतरच याचे उत्तर मिळणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्व पक्ष आपापल्या स्तरावर तयारीला लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला, विरोधी पक्षांनी मतदार यादीतील त्रुटींवरून, दुबार मतदार यावरुन निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र आयोगाने ही फेटाळली आहे.

आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून नेमकी कोणती घोषणा होते, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होतात का, संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल, आचारसंहिता कधी लागू होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे आज दुपारी ४ वाजता निवडणूक आयोग निवडणुकांचे बिगुल वाजवणार का, हे स्पष्ट होईल.

Zilla Parishad or Municipal Corporation? State Election Commission’s press conference today at 4 pm

महत्वाच्या बातम्या