मराठी माणसाची शेवटची अस्मितेची लढाई, संजय राऊत म्हणाले अंगात उत्साह संचारलाय

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठी माणसाची ही शेवटची अस्मितेची लढाई आहे. मराठी माणूस कोणत्याही पदावर असो, कोणत्याही परिस्थितीत असो त्याने या लढाईत मुंबई वाचवण्यासाठी उतरले पाहिजे, असे सांगत निवडणुका आल्याने अंगात उत्साह संचारला असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. Sanjay Raut

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. पुढील महिन्याच्या 15 जानेवारीला राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांचे मतदान पार पडणार आहे. या निवडणुकांची घोषणा होताच गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे शांत असलेले संजय राऊत माध्यमांसमोर आले. ते म्हणाले , उद्धव ठाकरेंची परवानगी घेऊन तुमच्यासमोर बोलण्यास उभा असून काल निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अंगामध्ये उत्साह संचारला आहे.

राऊत म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे तब्येत सुधारायला हवी. उद्धव ठाकरेंची परवानगी घेऊन तुमच्यासमोर बोलण्यासाठी उभा आहे. काल मुंबईसह 29 महापालिकांच्या तारखा जाहीर झाल्या. त्यामुळे अंगात उत्साह संचारलेला आहे. ट्रीटमेंट सुरूच राहिल. पण मुंबईतील मराठी माणसाच्या अस्मितेची ही लढाई आहे. त्यामुळे मराठी माणूस कोणत्याही पदावर असो, कोणत्याही परिस्थितीत असो त्याने या लढाईत मुंबई वाचवण्यासाठी उतरले पाहिजे, असे आमच्यासारख्याचे म्हणणे आहे. ज्याने या मुंबईचे अनेक लढे पाहिले, संघर्ष केला. त्यांना स्वस्थ बसता येणार नाही.

मुंबईत गेल्या काही दिवसापांसून पोस्टर लागले आहेत. मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाला आवाहन करणारे हे बॅनर आहेत. त्यावर कोणत्याही पक्षाचे नाव नाही. पण तरी सरकारला भीती वाटली आणि त्यांनी एका रात्रीत ते पोस्टर काढायला लावले. का तर अचारसंहिता भंग होतो म्हणून. पण ही आचारसंहिता मराठी माणसाला आणि विरोधी पक्षाला आहे. मात्र, जी सरकारची लोकं आहेत त्यांना आचारसंहिता आहे का? असा खोचक सवालच यावेळी राऊतांकडून उपस्थित कऱण्यात आला. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या 10 मिनिटं आधीपर्यंत शासनाचे आदेश निघत होते. नगरविकास खात्याचे आदेश निघत होते. विकासाच्या घोषण होत होत्या. मग ते पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोग चार वाजता तारखांची घोषणा करतो, असा घणाघातही यावेळी राऊतांनी केला.

तर, सत्ताधाऱ्यांकडून होणारी घोषणा हा आचारसंहितेचा भंग नाही का?. पैशाच वाटप प्रचंड होणार. 15 लाखाची मर्यादा, 13 लाख, 11 लाख, 9 लाख. मुंबई, नागपूर, पुणे अ मध्ये येतात. त्यांना 15 लाखांची मर्यादा आहे. निवडणूक आयोग खात्रीने सांगू शकतो का? की सत्ताधारी पक्ष 15 लाखांवरच थांबणार आहे. जो सत्ताधारी पक्ष नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत 100 ते 150 कोटी खर्च करतो, त्या सत्ताधारीने पक्षाने नगरसेवक फोडण्यासाठी दोन-दोन, पाच-पाच कोटी खर्च केलेत ते 15 लाखांची खर्च मर्यादा पाळणार आहेत का? त्यासाठी निवडणूक आयोग कोणती यंत्रणा राबवणार आहे? मुंबई मराठी माणसाच्या हातून हिसकावून घेण्यासाठी जो पैशांचा खेळ चालणार, तो निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी पाहणार आहे का?” असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करत खासदार संजय राऊत यांनी महायुतीला डिवचले आहे.

Sanjay Raut said that he was filled with enthusiasm

महत्वाच्या बातम्या