Shinde Camp : शिंदे गटाचा व्यंगचित्रप्रहार, उबाठावर तुफान टीका ‘खाऊन दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ म्हणत उद्धव ठाकरेंची खिल्ली

विशेष प्रतिनिधी

ठाणे : Shinde Camp  राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या घोषणेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेने उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर व्यंगचित्राद्वारे जोरदार प्रहार केला आहे. Shinde Camp

वरळीतील आदित्य ठाकरे यांच्या सभेत आज ‘करून दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ हा नारा देण्यात येणार आहे. मात्र, सभेच्या काही तास आधीच शिंदे गटाने या घोषणेचा फज्जा उडवत सोशल मीडियावर एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले आणि ते क्षणात व्हायरल झाले. Shinde Camp

व्यंगचित्रात धुमाकूळ घालणाऱ्या धुरंधर सिनेमातील ‘रेहमान डकैत’ या पात्राचा आधार घेत उद्धव ठाकरे दाखवण्यात आले आहेत. चित्रात रेहमान डकैत शैलीत उद्धव ठाकरे ‘खाऊन दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ असे म्हणताना दाखवले आहेत. त्याला घाबरून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे ‘खाऊन नव्हे करून म्हणा’ अशी विनवणी करताना दिसत आहेत. Shinde Camp



उबाठा गटाने गेल्या २५ वर्षांत मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवताना सव्वा लाख कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपने नुकताच केला असून, त्याच पार्श्वभूमीवर हे व्यंगचित्र आले आहे.

नागपूर अधिवेशनातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका करत, “मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकैत कोण, त्यांना गाडून टाकू” असे वक्तव्य केले होते. त्याच संदर्भाला जोडून आता शिंदे गटाने हे व्यंगचित्र सोशल मीडियावर टाकत उबाठावर राजकीय दबाव वाढवला आहे.

परिणामी, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा व्यंगचित्रप्रहार उबाठा गटासाठी मोठा डोकेदुखी ठरत असून दोन्ही गटांतील कलगीतुरा अजून तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Shinde Camp Launches Cartoon Attack, Mocks Uddhav with ‘Proud to Have Eaten’ Jibe

महत्वाच्या बातम्या