विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : शेतकऱ्याने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी सावकारांनी त्याला किडनी विकण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. कंबोडियातील नॉम पेन्ह शहरात नेऊन किडनी विकण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सावकारांवर गुन्हा दाखल केला आहे. sold kidney
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील ही घटना आहे. रोशन सदाशिव कुडे (29) या युवा शेतकऱ्याने एक लाखाचे कर्ज घेतले होते. त्यावर तब्बल 73 लाखांचे व्याज झाले. ही फेडण्यासाठी किडनी त्याने जमीन विकली. त्यातूनही कर्ज न फिटल्याने त्याला सावकारांनी कर्जफेडीसाठी किडणी विकण्यास भाग पाडले. त्यासाठी रोशन कुडे याला कंबोडियातील नॉम पेन्ह शहरात नेऊन किडनी विकली. 14 ऑक्टोबर 2024 रोजी त्याची किडनी काढण्यात आली आणि 26 ऑक्टोबरपर्यंत तो कंबोडियातील रुग्णालयात होता. त्यातून कर्जफेड करून घेतली. शेतकऱ्याला 8 लाख रुपये दिले. विशेष म्हणजे रोशनने 2021 मध्ये एक लाखाचे कर्ज घेतले होते आणि त्यावर 40 टक्क्यांनी व्याज आकारण्यात आला होता. अवघ्या चार वर्षात एक लाखाच्या कर्जावर सावकारांनी 73 लाखांचे व्याज चढवले होते.
रोशन कुडे याची 4 एकर जमीन होती. मात्र, शेतीत नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे खूप नुकसान झाले. त्यामुळे त्यांना दुधाचा व्यवसाय करण्यासाठी गाई विकत घेण्यासाठी वेगवेगळ्या सावकारांकडून एक लाखाचे कर्ज घेतले. मात्र, तो व्यवसायही बुडाला. त्यानंतर कर्जवसुलीसाठी सावकार त्यांच्या पाठी लागले होते. कर्जफेडीसाठी रोशन कुडे यांनी शेत विकले, दुचाकी विकली. तरीही कर्ज फिटले नाही. अशातच त्याला किडनी विकण्याचा सल्ला या सावकारांनी दिला. हतबल झालेल्या रोशनला याची फारशी कल्पना आली नाही. तरीही या सावकारांनी त्याला कोलकात्याला नेले आणि त्यानंतर कंबोडियात नेऊन त्याची किडनी काढली.
ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सहा जणांविरोधात बेकायदा सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे. किशोर रामभाऊ बावनकुळे, प्रदीप रामभाऊ बावनकुळे, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे आणि संजय विठोबा बल्लारपुरे यांना ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी रोशन कुडे चार महिने पोलिसांकडे दाद मागण्याचा प्रयत्न करत होता. पण कुणीही त्याची दखल घेतली नाही. दरम्यान, रोशनला कोलकात्याला नेण्यापूर्वी चेन्नईतील डॉ. कृष्णा यांच्याशी त्याचा ऑनलाईन संवाद करून देण्यात आला. या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच त्याला कोलकात्याला पाठवण्यात आले. तिथे त्यांच्या रक्ताचे तपासणी आणि इतर तपासण्या करण्यात आल्या, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
Moneylenders sold kidney of a farmer to pay off his loan
महत्वाच्या बातम्या
- राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवण्यासाठी काँग्रेस आक्रमक, नाना पटोले मांडणार ठराव
- Padalkar–Awhad : पडळकर – आव्हाड राड्यात कार्यकर्त्यांना शिक्षा, समितीने केली कारवाईची शिफारस
- चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का
- निवडणूक 20 दिवस पुढे ढकलून निकाल फिरवण्याचे काम, विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर आरोप