विशेष प्रतिनिधी
मुंबई : इस्त्रायली गुप्तहेराच्या कथित स्टिंग ऑपरेशनवर कॉन्स्पीरसी थेअरी मांडत भारताचा पंतप्रधान बदलून त्या जागी एखादा ‘मराठी माणूस’ पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो,” असा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. आता त्यावर संजय राऊतही बोलले आहेत.
संजय राऊत पृथ्वीराज चव्हाण यांनी 19 डिसेंबरबाबत केलेल्या विधानाबाबत म्हणाले की, 19 डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेमध्ये किंवा संसदबाहेर काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. त्या कागदपत्रांमधून एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित भारतासंदर्भातील माहिती समोर येणार असून, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा संदर्भात धक्कादायक माहिती असण्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. ही माहिती अत्यंत स्फोटक असून अंधभक्तांना कायमच्या कोमात पाठवणारी असेल.
या गौप्यस्फोटानंतर भाजपाची मोठी फजिती होणार असून कितीही प्रयत्न केले तरी भाजपा सत्तेत टिकू शकणार नाही, असे विश्लेषण समोर आले असल्याचे यावेळी राऊतांनी सांगितले. तर, पृथ्वीराज चव्हाण हे या बाबतीत तज्ज्ञ असून त्यांनी अनेक स्तरांवर काम केले आहे. ज्यामुळे त्यांना याबाबतची अधिकची माहिती आहे. त्यामुळेच आज कोणीतरी म्हणत असेल की अमित शहांना 102 ताप आला आहे, काहीतरी मोठा स्फोट 19 तारखेला होणार आहे. त्यामुळेच भाजपाच्या सर्व खासदारांना दिल्लीत थांबण्यास सांगण्यात आले असून व्हीप जारी झाला आहे आणि सध्या धावाधाव सुरू आहे, असा दावाही खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, “”जगात बरेच काही चालले आहे. मध्यंतरी मी एक ट्वीट केले होते. ते ट्वीट खूप व्हायरल झाले होते. मी म्हटले होते की, कदाचित महिन्याभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल. मला अनेकांचे फोन आले. याचा अर्थ काय आहे. कोण म्हटले तुम्ही होणार आहात का? तर कुणाला याची पार्श्वभूमी माहिती नव्हती. आता मराठी माणूस होणार म्हणजे, आता बसलेल्या माणसाला बाजूला व्हावे लागेल, मी आधीच अधोरेखीत केले आहे, नाव न घेता. बहुतेक बदल घडण्याची शक्यता आहे. बदल घडला तरी काँग्रेसचा माणूस हा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे तेवढं बहुमत नाही. सत्तेत असलेल्या लोकांपैकीच कोणीतरी होईल आणि तो कदाचित ‘मराठी माणूस’ असू शकतो. 19 डिसेंबरला हे घडेल, असा माझा अंदाज आहे.”
या राजकीय भूकंपामागे आंतरराष्ट्रीय कारण असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, “अमेरिकेत एक ‘अॅमस्टिन’ नावाचा माणूस होता, जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने मोठमोठ्या बंगल्यांमध्ये कॅमेरे लावून लोकांचे खाजगी क्षण टिपले आहेत. अमेरिकन संसदेने कायदा केला असून, त्यावर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सही आहे. त्यानुसार 19 डिसेंबरला या प्रकरणातील 75 हजार फोटो आणि 20 हजार ई-मेल्सचा डेटा जाहीर होणार आहे. हा डेटा सर्च करता येणार असून, यात कितीही मोठा माणूस असला तरी त्याला संरक्षण मिळणार नाही, असे अमेरिकन संसदेने स्पष्ट केले आहे.”
“या माहितीत नेमकं कोणाकोणाचं नाव आहे आणि त्यांनी काय पराक्रम केले आहेत, हे 19 डिसेंबरला जगासमोर येईल. सोशल मीडियावर काही नावे चर्चिली जात आहेत. त्यामुळे मोठा बदल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आशा आहे, काही तरी होईल, हे ठरवून आम्ही पुढे चाललो आहे,” असे चव्हाण म्हणाले.
Raut also spoke on Prithviraj Chavan’s conspiracy theory, saying that shocking information about BJP will come out.
महत्वाच्या बातम्या
- राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवण्यासाठी काँग्रेस आक्रमक, नाना पटोले मांडणार ठराव
- Padalkar–Awhad : पडळकर – आव्हाड राड्यात कार्यकर्त्यांना शिक्षा, समितीने केली कारवाईची शिफारस
- चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का
- निवडणूक 20 दिवस पुढे ढकलून निकाल फिरवण्याचे काम, विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर आरोप