चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी मूत्रपिंड विक्री प्रकरणी पाच आरोपींना २० डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी

विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर:  Moneylending जिल्ह्यातील शेतकरी रोशन कुडे प्रकरणात स्थानिक न्यायालयाने ६ आरोपींपैकी ५ जणांना २० डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. १८ डिसेंबर  रोजी पोलिसांकडून रोशन कुडे यांची वैद्कीय तपासणी करण्यात आली. कुडे यांना केवळ एकच किडनी(Moneylending) असल्याचे या तपासणीत स्पष्ट झाले आहे.



रोशन कुडे (वय २९) यांनी आरोप केला होता की, प्रचंड व्याजदरांमुळे १ लाख रुपयांचा कर्जाचा बोझा  ७४ लाख रुपयांवर पोहोचल्याने त्यांना कंबोडियामध्ये किडनी विकण्यास भाग पाडले गेले. कुडे यांच्या आरोपानुसार, सावकाराने  ४०% व्याजदराने कर्ज दिले होते.

त्याचबरोबर  जमीन, ट्रॅक्टर आणि अन्य मालमत्ता विकूनही व्याजाच्या बोज्यामुळे त्यांना ८ लाख रुपयांना किडनी विकावी लागली. कंबोडियातून परतताना त्यांना लाओसमध्ये बंधक बनवण्यात आले होते. Moneylending

पोलिसांनी ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनमध्ये अवैध सावकारी, धमकी, गुन्हेगारी षडयंत्र आणि अवयव तस्करी संबंधीत गुन्हा नोंदवला आहे. रोशन कुडे यानी केलेल्या दाव्यांची पडताळणी  पोलिसांकडून करण्यात येत आहे. Moneylending

किशोर बावनकुळे, प्रदीप बावनकुळे,संजय बल्लारपुरे, लक्ष्मण उरकुडे, मनिष घाटबांधे, सत्यवान बोरकर अशी या प्रकरणातील आरेपींची नावे आहेत. Moneylending

” पुढील तपास सुरू आहे. कुडे यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली  असता, त्यांनी अनेक सावकारांकडून  कर्ज घेतल्याचे आढळले आहे,” असे चंद्रपूर पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्माका यांनी सांगितले.

Five accused in the kidney selling case from Chandrapur district have been remanded to police custody until December 20.