विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis ड्रग्ज प्रकरणामध्ये राजकीयदृष्ट्या जाणीपूर्वक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो चुकीचा आणि निषेधार्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावातील रिसॉर्टमध्ये सातारा पोलिसांनी छापा टाकत 45 किलो ड्रग्जचा साठा पकडला. धक्कादायक बाब म्हणजे या 45 किलो ड्रग्जची किंमत ही 145 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. तसेच, या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांचा कसा संबंध आहे? याबाबतची माहिती सुद्धा अंधारेंनी दिली. पण आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया पहिल्यांदाच समोर आली आहे. फडणवीसांनी (Devendra Fadnavis ) उपमुख्यमंत्री शिंदेंची ढाल बनत या प्रकरणावरून त्यांना क्लीन चिट दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) हे शुक्रवारी (ता. 19 डिसेंबर) वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदेंवर करण्यात येणाऱ्या आरोपांबाबत आणि एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्यासंदर्भात होणाऱ्या मागणीबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी याबाबत उत्तर देत म्हटले की, सर्वप्रथम मी पोलीस विभाहगाचे अभिनंदन करतो कारण, त्यांनी त्या ठिकाणी चाललेल्या धंद्याचे पुर्णपणे पर्दाफाश करण्याचे काम केले. त्या ठिकाणी त्यांनी मोठी कारवाई केली आहे. या संपूर्ण तसेच, या प्रकरणात आतापर्यंत जे काही पुरावे समोर आले आहेत, त्यात एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा कोणताही संबंध दुरान्वयानेही आलेला नाही. त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारे दिशाभूल करून संबंध जोडण्याचे काम सुरू आहे. पण हे काही योग्य नाही. या संदर्भात पूर्ण चौकशी सुरू असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर, याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी या लढ्याला डिमॉरलाइज करू नये. मी पुढील दोन दिवस शांत राहणार आहे. पण पुन्हा 22 आणि 23 डिसेंबरला नवीन माहिती घेऊन समोर आली आहे.
सुषमा अंधारेंनी सावरी गावाचा नकाशा प्रसार माध्यमांना दाखवत त्या स्वतः त्या गावात गेल्या होत्या, अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली. या ठिकाणी कोयनेचे बॅकवॉटर आहे, असे सांगत अंधारे म्हणाल्या की, या ठिकाणी स्विमिंग टँक तयार होत आहेत. रिसॉर्ट होत आहे. इथून जवळ असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये कारवाई करण्यात आली. इथे 75 लाख खर्च करून रस्ता तयार करण्यात आला आहे. इथे गाव नाही, माणूस नाही तरी येथे शेडला जोडणारा रस्ता का तयार करण्यात आला? येथील रिसॉर्टमध्ये सात ते आठ रूम बांधून तयार आहेत. या रिसॉर्टमध्ये अनेक सुविधा आहेत. याठिकाणी एक डस्टर गाडी आहे. पोलिसांनी या रिसॉर्टमध्ये केलेल्या कारवाईत 45 किलो ड्रग्स सापडले. याची किंमत 145 कोटी आहे. ही बातमी फार चर्चेत आली नाही. हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे आहे, असा दावा अंधारेंनी केला.
Devendra Fadnavis clarifies deliberate attempt to bring Deputy Chief Minister Eknath Shinde’s name in drugs case
महत्वाच्या बातम्या
- Nana Patole : महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा, नाना पटोले यांची पंतप्रधानांकडे मागणी
- Valmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज फेटाळला
- माणिकराव काेकाटे यांना पाेलीसांनीच पळवले, प्रकाश आंबेडकर यांचा आराेप
- हे देशप्रेम नव्हे तर पाकिस्तान प्रेम, एकनाथ शिंदे यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर संताप