विशेष प्रतिनिधी
मुंबई : Municipal Councils राज्यातील विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. उर्वरित काही ठिकाणी शनिवारी मतदान होणार असून, सर्व ठिकाणी २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.Municipal Councils
राज्यातील २३ अध्यक्षपदे व १४३ सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान होणार आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आदी जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडत असून, संबंधित मतदारसंघांमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.Municipal Councils
राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार २ डिसेंबर रोजी २६३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.Municipal Councils
निवडणूक काळात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. सर्व्हिलन्स टीम, फ्लाइंग स्कॉड आणि व्हिडीओ शूटिंग पथके कार्यरत ठेवण्यात आली असून, निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवले जात आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश देत सांगितले की, १५ डिसेंबरच्या संध्याकाळपासून आचारसंहिता लागू असून, या कालावधीत भरारी पथकांनी सतर्क राहावे. चेकपोस्टवर सर्व्हिलन्स टीम तैनात राहणार असून, फ्लाइंग स्कॉड निवडणूक काळातील गैरप्रकारांवर नजर ठेवतील. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे.
मतदारांना सहज आणि निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शक्य त्या ठिकाणी आदर्श मतदान केंद्रे व पिंक मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रभागनिहाय नकाशे, उमेदवारांची यादी, मतपत्रिका व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पोलीस यंत्रणेसोबत समन्वय साधून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगातील वरिष्ठ अधिकारी या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततेत आणि नियमांनुसार पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
Voting Today for Municipal Councils and Nagar Panchayats, Counting on December 21
महत्वाच्या बातम्या
- सातारा ड्रग्स कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्या, हर्षवर्धन सपकाळ
- संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटविण्याची मागणी
- बांगलादेशात युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर प्रचंड असंतोष, देशभर आंदोलन; ढाकामध्ये जाळपोळ
- विधानसभा निवडणुकीत आघाडीचा टांगा पलटला, आता महापालिकेत घोडेही फरार, एकनाथ शिंदेंचा टोला