Raj Thackeray : अचानक बडव्यांशी हातमिळवणी कशी केली? आशिष शेलार यांचा राज ठाकरे यांना सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Raj Thackeray पक्ष वेगळा करताना तुम्हीच म्हणाला होतात की चार कारकुनांनी पक्षाचा ताबा घेतला आहे. हे चार कारकून कोण आहेत? या बडव्यांशी आणि कारकुनांशी घरोबा का? अचानक ही हातमिळवणी कशी केली?” असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री आशिष शेलार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केला आहे.Raj Thackeray

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांनी बुधवारी युतीची घोषणा केली. यावर आशिष शेलार म्हणाले की, “दोन पक्ष का निर्माण झाले? याचे उत्तर मराठी माणूस तुम्हाला विचारत आहेत. कोणत्याही मराठी माणसाने तुम्हाला दोन पक्ष वेगळे करा, असे सांगितले नव्हते. राज ठाकरेंचे विधान होते, मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे. मग हे बडवे कोण? असा प्रश्न मराठी माणूस विचारात आहे.Raj Thackeray



देवेंद्र फडणवीस यांचे अनेक व्हिडिओ आपल्याकडे आहेत असे सांगत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ उपक्रम राबविणार असल्याचा इशारा दिला आहे. यावर पलटवार करताना आशिष शेलार म्हणाले की, “लाव रे तो व्हिडीओ म्हणणाऱ्या लोकांना एकच सांगायचे आहे की, आमच्याकडे तुमचे असंख्य व्हिडीओ आहेत. आम्हीही ते व्हिडिओ लावून तुमच्या डोळ्यांत अंजन घालू. तुम्ही काहीही बोलाल आणि मुंबईकर ते मान्य करतील, असे समजू नका.

आशिष शेलार म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मुंबईकरांनी भरभरून आशीर्वाद दिला. या विकासकामांच्या यशामुळे हे दोन्ही पक्ष घाबरले आहेत. ही युती मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही, तर स्वतःच्या पक्ष अस्तित्वासाठी आणि भितीपोटी झालेली हातमिळवणी आहे.”

राज ठाकरेंच्या विधानांचा समाचार घेत आशिष शेलार यांनी सवाल उपस्थित केला की, “राज ठाकरे म्हणतात जागावाटप करणार नाही, मग एका भावाला दुसऱ्याला फसवायचे आहे की, अजूनही वादविवाद मिटलेले नाहीत? तुम्हाला नक्की कशाची भीती वाटत आहे? राज ठाकरे मुले पळवणाऱ्या टोळीबद्दल बोलत आहेत. पण 2017 मध्ये मनसेचे नगरसेवक कोणी पळवले होते? राज ठाकरेंनी शेजारी बसलेल्या उद्धव ठाकरेंना विचारावे. त्यांनी नगरसेवक पळवणाऱ्या टोळीच्या म्होरक्यासोबत हातमिळवणी कशी केली?

How did you suddenly join hands with the Badves? Ashish Shelar questions Raj Thackeray

महत्वाच्या बातम्या