विशेष प्रतिनिधी
मुंबई : खोपोलीत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निषेध व्यक्त करतोच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांमध्ये व्यापकता आणून एसआयटी ( SIT) स्थापन करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली. Sunil Tatkare
तपास यंत्रणांनी शीर्घगतीने तपास करून आरोपींना अटक करावी अशी मागणी करतानाच इतर बाबतीत जे बोलले जात आहे ते तथ्यहीन आहे असेही तटकरे यावेळी म्हणाले.
एखाद्या घटनेत तपास सुरू असतो त्यावेळी एखादे मतप्रदर्शन करणे उचित नसते. जी घटना घडली किंवा त्यांचे काय वादविवाद होते याबद्दलची माहिती नक्कीच पोलीस विभागाकडे असणार आहे. माझ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसावा असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. तपास सुरू आहे. त्यामुळे तपासात काही बाधा येईल असे कोणतेही वाक्य मी बोलणार नाही असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
खोपोलीच्या नगरसेवक मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे (वय 45) यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येत कटात सामील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्यासह इतर आठ जणांची देखील नावे समोर आली आहेत.
मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी काळोखे आपल्या मुलाला शाळेत सोडायला गेले होते. मात्र परतताना त्यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला चढवत निर्घृणपणे त्यांची हत्या केली. हल्लेखोर हे एका काळ्या रंगाच्या गाडीतून आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला रुमाल बांधल्याने त्यांची ओळख पटू शकली नसल्याचे उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
Sunil Tatkare demands the Chief Minister to form an SIT for investigation
महत्वाच्या बातम्या
- विशिष्ट लोकांचे जोडे चाटून मते मिळविण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
- पुण्यात आपचा एकला चलोचा नारा; १६५ पैकी १६४ जागांवर उमेदवार
- दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीमुळे नाराज प्रशांत जगताप यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राजकारणातील नैतिकता रसातळाला, भाजपाचा हल्लाबोल