महाराष्ट्र लुटला जातोय, कमिशनखोरी सरळसरळ 20 ते 25 टक्क्यावर, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र लुटला जातोय. याठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार आहे. कमिशनखोरी सरळसरळ 20 ते 25 टक्क्यावर जात आहे. महाराष्ट्रात तर सर्व कामं मॅनेज करून दिली जात आहेत. कुठल्याही कामात स्पर्धा होत नाहीय. सरळसरळ कमिशन घेऊन कामं वाटली जात आहेत, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. Vijay Wadettiwar

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून (23 फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. 25 मार्चपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात 6 मार्च रोजी दुपारी 2 वाजता 2026-27 वर्षाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. याचपार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र नेहमीप्रमाणे विरोधकांकडून चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांकडून आय़ोजित पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडून केवळ घोषणा आणि लोकांची फसवणूक होत असल्याचा आरोप केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ हे स्लोगन महायुती सरकारचं होतं. त्या भरवशावर त्यांनी सत्ता मिळवली. परंतु शेष नागावर पृथ्वी अशी अख्यायिका आहे, तसं आयत्या बिळावर नागोबा अशी सध्याची स्थिती आहे. महाराष्ट्र कुठे आहे आज? महाराष्ट्रात शेतकरी, बरोजगारी, गुंतवणूक कुठे आहे? केवळ घोषणा आणि लोकांची फसवणूक यासाठी महाराष्ट्राची जगभर चर्चा आहे. ड्रग्समध्ये महाराष्ट्र खूप पुढे गेलाय, त्यामुळे चहापानाला का जायचं? हा आम्हाला प्रश्न आहे. तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादांचा विमान अपघात होतो, पण शासनाकडून केवळ दोन ओळींची लाईन म्हटली जाते. यात कुठेही आणि कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये. पण आम्हाला विचारायचं आहे, का प्रश्न करू नये? हा घातपात आहे की अपघात आहे? या संदर्भात महाराष्ट्रासह देशभर चर्चा सुरू आहे. परंतु या प्रकरणात सरकारची भूमिका संदिग्ध आहे आणि महाराष्ट्र हे सर्व बघतोय. अशावेळी आम्ही का जायचं चहापानाला? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला.



विजय वडेट्टीवार म्हणाले की, भारत आणि अमेरिका ट्रेड डीलनंतर महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? याबाबत मुख्यमंत्र्यांकडून काही उत्तर आलं का? मक्यावर काय परिणाम होणार? तूरडाळ या पिकांचं कबंरडं मोडलं जाणार. महाराष्ट्रात एमएसपीने कुठेही शेतकऱ्यांचा माल विकत घेतला जात नाही. तसेच सीसीआयएमुळे कापूस खरेदी निम्म्यावर आली आहे. कारण या सरकारने जाचक अटी घातल्या आहेत. त्यामुळे 40 ते 45 टक्के कापूस शेतकऱ्याच्या घरात पडून आहे. तसेच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट केलीय. परंतु हे सरकार कुंभकर्ण आहे आणि शेतकऱ्यांबद्दल त्यांना अजिबात कणव नाही. सोयाबीनला 4 हजार रुपयांपलीकडे एक रुपया मिळाला नाही. सरकारला चॅलेंज आहे, कुठेही एमएसपीने मक्याची खरेदी झाली का? तर नाही झाली. कारण शासनाने खरेदी केली नाही. व्यापाऱ्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना जिवंतपणी मरण यातना देण्यासासारखा निर्णय घेतलाय. यवतमाळ जिल्ह्यात एका महिन्यात 22 आणि मराठवाड्यात 76 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं. असे असतानाही सरकारची भूमिका शेतकरी विरोधी आहे. धक्कादायक म्हणजे दुर्देवाने महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला सावकाराच्या कर्जामुळे आपली किडनी विकावी लागते. कारण, सध्या शेतकरी लुटीचं काम सुरू आहे, असा खळबळजनक आरोप सुद्धा वडेट्टीवार यांनी केला.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, भास्कर जाधव यांनी आताच सांगितलं की, लाडक्या बहिणींमुळे महाराष्ट्र कर्जबाजारी झालाय, त्यामुळे बाकी योजनांना कात्री लावलीय. पण डावोसमध्ये जाऊन 30 लाख कोटींचे करार केलेत. आम्ही या संदर्भात व्हाइट पेपरची मागणी करणार आहोत. त्यांनी व्हाइट पेपर काढलाचा पाहिजेच आणि महाराष्ट्र पुढे चित्र आलं पाहिजे. एवढे जर करार होत असतील तर महाराष्ट्रातील बहिणींना 1500 च्या ठिकाणी 3000 का देत नाही? एवढी मोठी गुंतवणूक येत आहे. परंतु हे सर्व ढोंग आहे. खील विजय वडेट्टीवार यांनी केला.

Maharashtra Is Being Looted, Commissions at 20–25%,” Alleges Vijay Wadettiwar

महत्वाच्या बातम्या