विशेष प्रतिनिधी
खोपोली : खोपोली/आडोशी भागाजवळ प्रोपिलीन गॅस टँकर पलटल्या कारणाने ३३ तास झालेल्या वाहतूक कोंडी मुळे त्रास झालेल्या १ लाख २० हजार प्रवाशांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) तब्बल पाच कोटी सोळा लाख रुपयांची परतफेड करणार आहे.refunds toll
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) ने सांगितले आहे की ज्यांच्याकडून टोल वसूली झाली होती — त्यांना ₹५.१६ कोटी पर्यंत रक्कम परत मिळणार आहे आणि ही रक्कम पुढील काही दिवसांत FASTag च्या साह्याने वाहनचालकांच्या खात्यात जमा होईल असे राज्य सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.Refunds toll
या रस्त्यावर प्रोपिलीन नावाच्या गॅस ने भरलेले टँकर पलटी झाल्याचे कळाल्यानांतर गॅस लिक आणि त्याच्यामुळे प्रवाश्याना होणाऱ्या धोक्यामुळे प्रशासनाकडून एक्सप्रेसवे पूर्णपणे बंद करण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडी हि तब्बल ३३ तास चालली होती.या करणाने प्रवाश्यांकडे कुठलेही मूलभूत सेवा नसल्या मुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.गॅस पूर्णरीत्या दुसऱ्या टँकर मध्ये यशस्वी रित्या हस्तांतरित केले गेले.
अपघातांनंतर काही अंतरावर वाहतुकीची तीन वेळा अडथडा करून परिस्तिथी सुधारण्याच्या प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आला ,आणि हा रास्ता प्रवासासाठी परत सुरु करण्यात आला.अशी दुर्घटना परत होऊ नये आणि अशा घटनांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी (Mumbai–Pune Expressway) वर आपत्कालीन वळणमार्ग वाढवणे, त्वरित प्रतिसाद पथके तैनात करणे, धोकादायक टँकरसाठी कडक नियम लागू करणे आणि रिअल-टाइम वाहतूक माहिती प्रणाली मजबूत करणे असे उपाय सुचवण्यात आले आहेत.
या वाहतूककोंडीच्या घटनेत हजारो वाहनचालक आणि प्रवासी द्रुतगती मार्गावर तासन्तास अडकून पडले होते. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांकडून टोल परताव्याची मागणी तीव्र झाली होती. अखेर सुमारे १.२ लाख प्रवाशांना ५ कोटी १६ लाख रुपये परत मिळणार आहे , अशी घोषणा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) ने केल्यांनतर वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
State government refunds toll of 5.16 crore to 1.20 lakh commuters stranded on February 3 expressway
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तीव्र करणार, राजू शेट्टी यांचा इशारा
- Rahul Gandhi राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी; भाजपने ठाण्यात दाखवले काळे झेंडे
- Bhiwgan Case : भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधार गृहात रवानगी
- Muslim Reservation : मुस्लिम समाजाच्या आरक्षण रद्द विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका