Parth Pawar : पार्थ पवार यांची खासदारकी निश्चित, राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून उमेदवारी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Parth Pawar दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाने घेतला आहे. त्यामुळे पार्थ पवार यांची खासदारकी निश्चित झाली आहे.



सोमवारी रात्री पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१९ साली पार्थ पवार (Parth Pawar) यांनी मावळ लाेकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली हाेती. मात्र, त्यावेळी शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्याकडून त्यांना पराभव पत्काराव लागला हाेता. बारामती लाेकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाला हाेता. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविण्यात आले हाेते. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची धुरा साेपविण्यात आली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. या जागेवर आता पार्थ पवार यांची वर्णी लागणार आहे.
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर आराेप झाले हाेते. याबाबत चाैकशीसाठी शासनाने नियुक्त केलेल्या विकास खारगे यांच्या समितीने पार्थ पवार यांना क्लिन चिट दिली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना कायदेशिरदृष्ट्या खासदारकीसाठी काही प्रश्न उरलेला नाही.

प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची खलबते पार पडली. या बैठकीला सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर होते. मात्र, आता त्यांना थेट दिल्लीच्या वरिष्ठ सभागृहात (राज्यसभा) पाठवून पक्षाने तरुण नेतृत्वाला संधी देण्याचे निश्चित केले आहे. त्याचबराेबर येत्या २६ फेब्रुवारीला वरळी डोम येथे होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची अधिकृतपणे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा केली जाईल.

Parth Pawar’s MP seat confirmed, nomination from Nationalist Congress

महत्वाच्या बातम्या