व्हीसीआर’ कंपनीच्या विमानाच्या रेकॉर्डमध्ये बनवाबनवी, राेहित पवार यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अजित दादांचा अपघात हा अपघात नसून घातपात आहे,” असा दावा त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ‘व्हीसीआर’ (VSR) कंपनीच्या विमानाच्या रेकॉर्डमध्ये मोठी बनवाबनवी सुरू असून यंत्रणांची एकमेकांशी मिलीभगत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे. Rohit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले होते. अजितदादांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताच्या तपासाबात राेहित पवार म्हणाले, अजित दादांच्या अपघातातील विमानाच्या चौकशीच्या निमित्ताने रोहित सिंगला काल पायलट म्हणून चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काल रोहित सिंग देशात आला होता. VSR कडे विमानाच्या ५००० तासांपैकी केवळ १८०० ते २००० तासांचा रेकॉर्ड उपलब्ध आहे. उर्वरित ३००० तासांचे रेकॉर्डस उपलब्धच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी, बनवाबनवी VSR ला करता यावी यासाठी चौकशी जाणूनबुजून लांबवली जात आहे का?



महाराष्ट्राचा लोकनेता गेला असताना अपघाताला जबाबदार कंपनीच्या मालकाला केवळ पायलट म्हणून चौकशीसाठी बोलावले जात असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा ? दादांच्या अपघाताच्या गुन्हेगारी अँगलची चौकशी सीआयडी करत असताना व्हीसीआरचा मालक भारतात आला असेल तर डीजीसीएने सीआयडीला कळवणे आवश्यक का समजले नाही? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

यापूर्वीही रोहित पवार यांनी पत्रकार परिषदा घेऊन ब्लॅक बॉक्सची माहिती, अपघातग्रस्त विमानाच्या कंपनीच्या मालकाची माहिती, त्यांना असलेले कथित राजकीय वरदहस्त याबाबत आराेप केले हाेते. त्यांच्या मते या विमानाची एकूण क्षमता ५ हजार तास उडण्याची होती. जेव्हा अजित पवारांना हे विमान देण्यात आले, तेव्हा त्याची क्षमता संपत आली होती. केवळ १०-१५ तास शिल्लक होते. त्यामुळे असे विमान अजित पवारांना देणे चुकीचे हाेते. तसेच हे विमान ८ हजार तासांहून अधिक काळ उडवले गेल्याची शक्यता असल्याचे रोहित पवारांनी वर्तवली होती. त्यातच, आता त्याचा रेकॉर्डच उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Rohit Pawar alleges that VCR company’s flight records were fabricated

महत्वाच्या बातम्या