विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी समृद्धी महामार्गावरील जटवाडा परिसरातील 23 एकर 30 गुंठे जमीन ड्रायव्हरच्या नावे ‘हिबानामा’ (बक्षीस पत्र) करून बळकावल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपानुसार, संबंधित जमीन संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांच्या नावावर हिबानामा (बक्षीस पत्र) करण्यात आली. हा हिबानामा 1971 साली झाल्याच्या दाखवलं जात आहे, मात्र जावेद रसुल शेख याचा जन्म 1985 मध्ये झाला. त्यामुळे 1971 मध्ये त्याच्या नावावर हिबानामा कसा होऊ शकतो? असा सवाल त्यांनी केला.
जटवाडा येथील ही जमीन महाराष्ट्र विकास मंडळाने संपादित केली . समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्याचे आदेश झाल्यानंतर तिचे संपादन मूल्य तब्बल 1150 कोटी रुपये निश्चित करण्यात आले. मात्र, इतक्या मोठ्या रकमेच्या मोबदल्यासाठी काही जणांनी मालकी हक्काचा दावा करत पैसे मिळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
या प्रकरणात सविस्तर कागदपत्रांसह मुख्यमंत्री यांना पत्र लिहून सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. चौकशी झाल्यास सर्व सत्य बाहेर येईल, असा दानवे यांनी केला आहे.
खासदार संदीपान भुमरे यावर म्हणाले की, “आपल्यावर जो आरोप करण्यात आला आहे तो चुकीचा आहे. तसा कोणताही हिबानामा झालेला नाही. जावेद रसुल हा माझा ड्रायव्हर आहे, पण त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. आरोप करण्यात आलेला जावेद हा दुसराच असेल. अंबादास दानवेंना सगळीकडे संदीपान भुमरेच दिसतात. अंबादास दानवे यांनी त्यांचे आरोप सिद्ध करून दाखवावं.”
MP Sandipan Bhumre’s land scam worth Rs 1150 crore, accused by Ambadas Danve
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तीव्र करणार, राजू शेट्टी यांचा इशारा
- Rahul Gandhi राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी; भाजपने ठाण्यात दाखवले काळे झेंडे
- Bhiwgan Case : भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधार गृहात रवानगी
- Muslim Reservation : मुस्लिम समाजाच्या आरक्षण रद्द विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका