विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत “मागचे झाले गेले गंगेला मिळाले, आता आपल्याला एकोप्याने काम करायचे आहे,” असे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुनर्मिलनाचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. ( Ajit Pawar Signals NCP Reunification, Praises Sharad Pawar’s Leadership)
अजित पवार म्हणाले की, यावेळी दोन्ही गटांनी तुतारी आणि घड्याळ एकत्र घेतले असून कोणतेही वाद निर्माण करायचे नाहीत. “मागील गोष्टी विसरून आता एकत्र काम करण्याची गरज आहे. साहेबांचे नेतृत्व हे भविष्याचा वेध घेणारे आहे,” असे सांगत त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाचे गौरवोद्गार काढले.Ajit Pawar
महापालिकेच्या राजकारणाबाबत बोलताना अजित पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली. केंद्र आणि राज्याचे राजकारण महापालिकेत आणू नये, तसेच महापालिकेचे राजकारण राज्य किंवा केंद्रात नेऊ नये, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर घणाघाती हल्ला चढवत अजित पवार म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरातील भ्रष्टाचाराचा आका कोण आहे, हे शोधून काढायचे आहे. त्या आकाला संपवायचे आहे आणि त्याला त्याची जागा दाखवायची आहे.” भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे हाच या निवडणुकीचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध स्वरूपात पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ajit Pawar Signals NCP Reunification, Praises Sharad Pawar’s Leadership
महत्वाच्या बातम्या
- प्रभाग २५ मध्ये भाजपा उमेदवारांचा घरोघरी संपर्क दौरा
- तुमको मिर्ची लगी तो मै क्या करू, बिनविराेधवरील टीकेवर मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबाेल
- Ashish Shelar : सावरकरांचे विचार मान्य असतील तर तुमच्या बरोबर, आशिष शेलार यांचा अजित पवारांना इशारा
- छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे ! केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्या विधानाने महाराष्ट्रात संताप