विशेष प्रतिनिधी
पुणे: CM Fadanvis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याबाबत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपण पुण्यातून निवडणूक लढवणार नसून नागपूरमधूनच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.CM Fadanvis
पुण्याकडे आपले विशेष लक्ष आहे, म्हणजेच भविष्यात पुण्यातून निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारण्यात आला असता फडणवीस म्हणाले, “पुण्यावर प्रेम जरूर ठेवायचं, पण निवडणूक नागपूरमधूनच लढवायची. नागपूरकरांनी मला सहा वेळा निवडून दिलं आहे. त्यांचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे.” पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्यासारखे सक्षम नेते असल्याने पक्षाची स्थिती भक्कम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.CM Fadanvis
अभिनेत्री गिरीजा ओक यांनी घेतलेल्या मुलाखतीत
‘देवाभाऊ काय म्हणतायत?’ या प्रश्नावर त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिले, “देवाभाऊ काही म्हणत नाहीत, देवाभाऊंचं काम बोलतं.”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष मजबूत आहेत. त्यामुळे ही मैत्रीपूर्ण लढत आहे. मी संयम ठेवला आहे, पण सध्या दादांचा संयम ढळलेला दिसतो. १५ तारखेनंतर ते काही बोलणार नाहीत.” प्रचारात मर्यादा पाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर बोलताना फडणवीस म्हणाले, “कोणतंही कुटुंब एकत्र येत असेल तर मला आनंदच आहे. राज ठाकरेंनी यासाठी मला क्रेडिट दिलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. दोन भाऊ एकत्र यावेत हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. आता दोन भाऊ आणि बहीण एकत्र येणार का, हे १५ तारखेनंतर कळेल.”
अजित पवार यांनी महिलांसाठी मेट्रोमध्ये मोफत प्रवासाची घोषणा केल्यावर फडणवीसांनी उपरोधिक टीका केली. “घोषणा करायला काहीच लागत नाही, पण त्या वास्तववादी असायला हव्यात. मेट्रोचे दर ‘फेअर सिस्टीम’ ठरवते. पुणेकरांना फुकट काहीही नको आहे, त्यांना विश्वासार्ह, दर्जेदार आणि वेळेवर सेवा हवी आहे,” असे त्यांनी सांगितले.
मुंबई मेट्रोच्या आरे कारशेड वादावर बोलताना ते म्हणाले की, “मेट्रो कामाला लोकांचा विरोध नव्हता, तर आमचे मित्र उद्धव ठाकरे यांनाच अडचण होती. आरेची जागा राखीव जंगल नाही, असा स्पष्ट अहवाल असूनही केवळ इगोसाठी त्यांनी कामाला स्थगिती दिली. यामुळे साडेतीन वर्षांचे काम तीन वर्षे पुढे गेले आणि प्रकल्पाचा खर्च १० हजार कोटी रुपयांनी वाढला. आम्ही दहापट झाडे लावून ती मोठीही केली, पण ठाकरेंच्या हट्टामुळे जनतेच्या पैशांचे नुकसान झाले,” असा आरोप त्यांनी केला.
Love Pune, But Polls Only from Nagpur: CM Ends Speculation
महत्वाच्या बातम्या
- Fadnavis : राज ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर, ठाकरे बंधूंवर निशाणा
- लाडक्या बहिणींना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; महायुतीचा जाहीरनामा जाहीर
- मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन
- शब्द शिवसेनेचा’ जाहीरनाम्याच्या माध्यमातून कायापालट करणार