विशेष प्रतिनिधी
पुणे : Ulhas Bapat महाराष्ट्रातील तत्कालीन शिंदे सरकार हे पहिल्या दिवसापासून बेकायदेशीर आहे. पक्षांतर कसे करावे याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्रात पाहायला मिळाले आहे, अशी टीका ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी केली. मात्र, निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला, तर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होईल, पण त्याचा सध्याच्या सरकारवर तात्काळ परिणाम होईलच असे सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रलंबित सुनावणीवर भाष्य करताना त्यांनी लोकशाही संस्थांच्या घसरत्या विश्वासाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.
पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना बापट (Ulhas Bapat) म्हणाले की, “लोकशाहीमध्ये ज्या संस्थांवर विश्वास असायला हवा, तो आता कमी होत चालला आहे. १५ वर्षांपूर्वी मी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल हे खात्रीने सांगू शकत होतो, मात्र आता तो विश्वास उरलेला नाही. भारताची लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाचे आहे, मात्र ३-३ वर्षे निर्णय लागत नसल्याने सामान्य जनतेत संभ्रमाचे वातावरण आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर टीका करताना बापट यांनी नमूद केले की, राज्यघटनेनुसार अध्यक्षांनी ‘अंपायर’ म्हणून काम करणे अपेक्षित आहे. मात्र, आपल्याकडे अध्यक्ष एखाद्या राजकीय पक्षाचे सदस्य असल्यासारखे वागतात. राहुल नार्वेकर यांनी ३ महिन्यात निर्णय घेणे आवश्यक होते, मात्र ६ महिने उलटूनही कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही.
बापट म्हणाले, वास्तविक पाहता उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नेमणे हाच योग्य घटनात्मक न्याय ठरला असता.पक्षचिन्ह कोणाला द्यायचे याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, मात्र त्यांनी बहुमत आणि पक्षाची घटना या दोन गोष्टींचा विचार करणे अनिवार्य होते. एकनाथ शिंदे यांची मुदत आता संपली आहे, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते आता अपात्र ठरत नाहीत, हा मोठा पेच आहे.सर्वोच्च न्यायालय स्वतःचा जुना निर्णय बदलू शकते, त्यामुळे येणारा निकाल हा पुढील काळासाठी नवा कायदा ठरेल.
Whatever the outcome regarding Shiv Sena, it will not affect the current government, says Ulhas Bapat
महत्वाच्या बातम्या
- पूर्व पुण्याच्या राजकारणात नवा अध्याय, रणनीती, संघटन व जनसंपर्काच्या जोरावर सुरेंद्र पठारे यांची दमदार कामगिरी
- पुण्यातला पहिला निकाल, प्रभाग क्र. २० भाजपचे तीन, प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेसचे प्रशांत जगताप
- मुंबईत फुलणार ११० पेक्षा जास्त कमळाची फुले, माेहित कंबाेज यांचा दावा
- पुण्यात ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी ५२.४२ टक्के मतदान