निवडणूक पथकाकडून मावळमध्ये साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्‍त

विशेष प्रतिनिधी

पुणे : विनापरवाना मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक करताना एका व्यक्तीस पकडण्यात आले आहे. निवडणूक विभागाच्‍या पथकाकडून गुरुवारी (दि. २९ जानेवारी) रोजी मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे ही कारवाई करण्‍यात आली. maval



अंतु रामदास शेटे (वय ४०, रा. नवलाख उंब्रे) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सध्‍या निवडणूक कर्तव्‍यावर असलेले अजिंक्य सुनिल म्हेत्रे (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी शुक्रवारी (दि. ३०) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपीकडून वाहनासह सुमारे सात लाख १० हजार रुपयांचा मुद्‌देमाल निवडणूक विभागाच्‍या नाकाबंदीत मिळून आला आहे. हा साठा विक्रीच्या उद्देशाने आणण्‍यात आला होता. या प्रकरणाचा तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे करीत आहे. maval

Election Squad Seizes Assets Worth ₹7.5 Lakh in Maval