Anil Deshmukh : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा, अनिल देशमुख यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

सातारा : Anil Deshmukh  दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती. त्यासाठी सगळे ठरले होते. अजितदादा, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळेंची बैठक झाली होती. जयंत पाटलांच्या घरी पहाटेपर्यंत बैठका चालल्या,” असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. अजितदादांची ही शेवटची इच्छा पूर्ण करावी, अशी भावनिक सादही त्यांनी घातली.Anil Deshmukh

अनिल देशमुख म्हणाले की, दोन्ही पक्ष एकत्र आणण्यासाठी आतापर्यंत एकूण १२ ते १३ बैठका पार पडल्या होत्या. शेवटची महत्त्वाची बैठक राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या घरी झाली होती. ही बैठक रात्री १० वाजता सुरू होऊन पहाटे ३ वाजेपर्यंत चालली होती. या बैठकीला ८ ते १० प्रमुख नेते उपस्थित होते. अजितदादा, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांचीही या विषयावर स्वतंत्रपणे बैठक झाली होती. या सर्व चर्चांनंतर ‘काय करायचे आणि कसे करायचे’ हे सर्व ठरले होते.Anil Deshmukh



देशमुख म्हणाले, “पवार साहेबांचे वय पाहता त्यांना आता अधिक त्रास देऊ नये, अशी अजितदादांची मनापासूनची भावना होती. दोन्ही पक्ष एकत्र यावेत, ही दादांची शेवटची इच्छा होती. आम्ही त्यांच्याशी झालेल्या १२ बैठकांचा तपशील साहेबांनाही दिला होता. आता दादा आपल्यात नाहीत, पण त्यांची ही इच्छा पूर्ण व्हायला हवी.”

आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर बोलताना देशमुखांनी सुनेत्रा वहिनींचे अभिनंदन केले, पण सरकारच्या घाईवर टीका केली. “सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या याचा आनंदच आहे, मात्र सध्या दुखवट्याची वेळ आहे. इतक्या घाईत शपथविधी उरकण्याची काहीच आवश्यकता नव्हती,” असे ते म्हणाले.

Ajit Dada Wants Both NCP Factions To Reunite, Claims Anil Deshmukh

महत्वाच्या बातम्या