विशेष प्रतिनिधी
मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानांने प्रवास करत होते त्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या विमान कंपनीवर युरोपियन हवाई नियामक संस्थेने (European Union Aviation Safety Agency) कारवाई केली होती. सुरक्षेच्या अत्यंत गंभीर त्रुटी आणि तपासात असहकार्य केल्यामुळे या कंपनीची ‘थर्ड कंट्री ऑपरेटर’ (TCO) अधिकृतता एक वर्षापूर्वीच निलंबित केली होती. तरीही ही कंपनी भारतात सेवा देत होती.
युरोपियन हवाई नियामक संस्थेच्या अहवालानुसार, व्हीएसआर व्हेंचर्सला ‘लेव्हल १’ या सर्वात गंभीर श्रेणीतील सुरक्षा त्रुटींमध्ये ठेवण्यात आले होते. ‘लेव्हल १’ म्हणजे ज्या ठिकाणीप्रवाशांच्या सुरक्षेचा कोणताही ठोस पुरावा नसतो किंवा संबंधित कंपनी नियामक संस्थांना सहकार्य करण्यास नकार देते. युरोपियन हवाई क्षेत्रात उड्डाण करण्यासाठी किंवा तिथे उतरण्यासाठी ही अधिकृतता अनिवार्य या कंपनीकडे नव्हती.
सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत या कंपनीच्या एका ‘लिअरजेट ४५’ विमानाला अपघात झाला होता. या अपघातासंदर्भात युरोपियन हवाई नियामक संस्थेने कंपनीकडे वारंवार कागदपत्रे आणि तांत्रिक माहिती मागितली होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये पाच वेळा स्मरणपत्रे पाठवूनही कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. कंपनीने अंतर्गत चौकशीचे अहवाल दिले नाहीत. याशिवाय सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती देण्यास नकार दिला. तसेच वारंवार पाठवलेल्या नोटिसींकडे दुर्लक्ष केले. या असहकार्यामुळेच युरोपियन हवाई नियामक संस्थेने या कंपनीवर बंदी घालून आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याचा शिक्का मोर्तब केला होता. युरोपियन युनियनने या बंदीच्या आदेशाची प्रत भारताच्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाला (DGCA) देखील पाठवली होती.
गेल्या आठवड्यात बारामती जवळ कोसळलेले लिअरजेट विमान देखील याच कंपनीच्या मालकीचे होते. या अपघातातअजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या कंपनीकडे आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्रे आणि आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता नव्हती, हे आता स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवला आहे. केंद्राच्या AAIB विभागाने ब्लॅक बॉक्स जप्त केला आहे. यातील माहितीवरून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. कंपनीच्या मालकांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
Shock Over Ajit Pawar Crash Flight: EU Had Banned VSR Ventures Aircraft Over Serious Safety Lapses
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : यूजीसीच्या वादग्रस्त नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
- दादा, तुम्ही आमच्यात नाहीत हे मन मान्यच करायला तयार नाही, प्रताप सरनाईक यांचे हृदयस्पर्शी पत्र
- सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची नरहरी झिरवळ मागणी
- दारू आणि नियमभंग, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमागे वैमानिकाचा धक्कादायक भूतकाळ