विशेष प्रतिनिधी
बीड: Manoj Jarange Patil मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियात या प्रकरणी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. त्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडचे नाव आल्यामुळे धमकी देणारा व्यक्ती कराड समर्थक असल्याचा दावा केला जात आहे.Manoj Jarange Patil
कॉल रेकॉर्डिंगमध्ये एक व्यक्ती समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना थेट मनोज जरांगेंना गोळ्या घालून ठार मारणार म्हणत आहे. पुन्हा धनंजय मुंडे व वाल्मीक कराड म्हणायचे नाही, अन्यथा तुलाही जीवे मारतो अशी धमकीही दिली आहे.Manoj Jarange Patil
व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप :
जरांगे समर्थक – पाटलांना काय करणार?
कराड समर्थक – मनोज जरांगे यांना कधी गोळ्या घालायच्या. मी स्वतः गोळ्या घालतो.
जरांगे समर्थक – तू गोळ्या घालणार आहेस का?
कराड समर्थक – हो स्वतः गोळ्या घालतो.
जरांगे समर्थक – काय करणार आहेस तू पाटलांना?
कराड समर्थक – मी तर मनोज जरांगे यांना जीवेच मारतो.
जरांगे समर्थक – बरं.. चालतंय.. बरं…
या ऑडिओ क्लिपमध्ये धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांचे नाव घेऊन धमकावण्यात येत आहे. तुझ्या …. जर गोळ्या घातल्या नाही, तर मुंडे व वाल्मीक कराड पुन्हा म्हणायचे नाही, असेही हा धमकी देणारा व्यक्ती म्हणताना ऐकू येत आहे. या ऑडिओ क्लिपमुळे मराठा समाजात एकच खळबळ माजली आहे. ऑडिओ क्लिपमधील या दोन व्यक्ती कोण? असा सवालही या प्रकरणी केला जात आहे. मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांच्यावर आपली सुपारी दिल्याचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी काही जणांना अटकही करण्यात आली होती. पण पुढे या प्रकरणात काहीही झाले नाही.
Manoj Jarange Patil Receives Fresh Death Threat, Warned Of Being Shot Dead Again
महत्वाच्या बातम्या
- भाजपसाेबत जाणार नाही.. नाही म्हणजे नाही, राज ठाकरे यांनी केले वृत्ताचे खंडन
- Sharad Pawar :विलीनीकरणाच्या चर्चेत जे उपस्थित नव्हते, त्यांना बैठकीबद्दल काय माहिती, शरद पवार यांचा सवाल
- Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार; पुण्यातील पाच आरोपींनी दिली कबुली
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रितीसंगमावर केले स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन