RSS Chief Mohan Bhagwat : भाजपमुळे संघाला नव्हे तर संघामुळे भाजपला अच्छे दिन, सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

मुंबई : RSS Chief Mohan Bhagwat  भाजपमुळे संघाला अच्छे दिन नसून त्याच्या उलट परिस्थिती आहे. खरं तर संघामुळे भाजपला अच्छे दिन आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.RSS Chief Mohan Bhagwat

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. मुंबईच्या वरळीतील नेहरू सेंटरमध्ये दोन दिवस ‘ संघ प्रवासाची १०० वर्षे, नवे क्षितीज ’ या विषयावर सरसंघचालक मोहन भागवत यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भागवत यांनी लिखित प्रश्नांना उत्तरे दिली.RSS Chief Mohan Bhagwat



 

भाजपमुळे संघाला अच्छे दिन आहेत का? कारण भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांना भाजपकडून प्रवेश दिला जात असताना संघ त्यांच्यावर दबाव का टाकत नाही? असे प्रश्न विचारण्यात आले. यावर मोहन भागवत म्हणाले की, भाजपमुळे संघाला अच्छे दिन नसून त्याच्या उलट परिस्थिती आहे. खरं तर संघामुळे भाजपला अच्छे दिन आहेत. कारण आम्ही कोणासाठीही काम करत नसून आमची नीती, विचार आणि ध्येयासाठी काम करतो. आमची नीती आणि विचार जे स्वीकारतात त्यांना लाभ होतो. जसे की, आम्ही अयोध्येतील राममंदिराच्या बाजूने भूमिका घेतली. ज्यांनी ती नीती स्वीकारली त्यांचा लाभ झाला. परंतु ज्यांनी आणीबाणीला विरोध किंवा राम जन्मभूमीसारखी आंदोलने आणि संघाच्या कार्यकर्त्यांचे परिश्रम यामुळे संघटनेचा पाया वाढला व आम्हाला लोकांचा विश्वास मिळाला. यामुळे आमचे ‘अच्छे दिन’ आले आहेत.

मोहन भागवत म्हणाले की, भाजप, विश्व हिंदू परिषद, अभाविप, मजदूर संघ आणि किसान संघ या संघप्रणित संघटना असून संघाचे कार्यकर्ते त्यात आहेत. त्यामुळे त्या संघटना प्रभावी आहेत. पण त्या संघटना संघाच्या शाखा नसून स्वायत्त, स्वतंत्र व स्वावलंबी आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र व कार्यपद्धती स्वतंत्र आहेत. राजकारण सिद्धांतावर असावे आणि विचार असावा, असे संघाचे मत आहे. पण आम्ही कोणावर दबाव टाकत नाही. आम्हाला कोणी सल्ला मागितला, तर सर्वांना देतो आणि त्यांना धोकाही दाखवून देतो. ज्याप्रमाणे कुटुंबातील पाच भावांचे स्वतंत्र व्यवसाय असल्यास ते कुटुंब म्हणून एकत्र असतात, पण एकमेकांच्या व्यवसायात लुडबुड करत नाहीत, त्याचप्रमाणे आमचीही कार्यपद्धती आहे. भाजपसह अन्य संस्थांनी आपल्या कार्यातून कमावलेले पुण्य त्यांचे असते, पण त्यांच्या पापात मात्र थोडा वाटा आमचा असतो. या संघटनांमध्ये संघातून गेलेले कार्यकर्ते असल्याने त्यांच्या पापाचा काही वाटा आमच्याकडे येतो आणि त्याला काही इलाज नाही. ती आमची जबाबदारी आहे, अशी स्पष्ट भूमिका मोहन भागवत यांनी मांडली.

RSS Chief Mohan Bhagwat Says Sangh Brought ‘Acche Din’ for BJP

महत्वाच्या बातम्या