पतीच्या पराभवाचा घेतला बदला, चार महिन्यांच्या मुलीला घेऊन प्रचार करत संस्कृती सातपुते विजयी

विशेष प्रतिनिधी

साेलापूर : माळशिरस विधानसभा मतदारसंघात पती राम सातपुते यांच्या पराभवाचा त्यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी बदला घेतला आहे. चार महिन्यांच्या मुलीला साेबत घेऊन प्रचार करत विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव केला. Ram satpute

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार संस्कृती सातपुते यांची लढत शरद पवार गटाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांच्यासोबत झाली. मात्र या लढतीचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या चार महिन्याच्या मुलीला घेऊन संस्कृती सातपुते यांनी जाेरदार प्रचार केला.

चार महिन्याच्या मुलीला घेऊन संस्कृती सातपुते प्रचार करत असल्यामुळेच महिला वर्गाची मोठी सहानुभूती मिळू लागली हाेती. त्यानंतर विरोधकांकडून या मायलेकीवर सोशल मीडियातून टीका करण्यास सुरुवात झाली हाेती. त्यावेळी राम सातपुते यांनी माझ्यावर टीका करा पत्नी व मुलीला कशाला मध्ये आणता असा जाहीर संतापही व्यक्त केला हाेता.

Sanskruti Satpute wins campaigning with her four-month-old daughter

महत्वाच्या बातम्या