विशेष प्रतिनिधी
शिरूर : राष्ट्रवादी काॅंग्रेसला शिरूर तालुक्यातील बालेकिल्ल्यात पहिला धक्का बसला आहे. नुकताच राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले राजेंद्र गावडे 3, 385 मतांनी विजयी झाले. माजी मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनाही हा धक्का मानला जात आहे.
टाकळी हाजी – कवठे येमाई मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने प्रथमच विजय मिळविला आहे. माजी आमदार पोपटराव गावडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठतेची केली आहे. त्यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक ऐनवेळी उमेदवारी कापल्याने त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करत टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गेली सहा दशके गावडे यांचा हा गड मानला जातो. मात्र, यंदा येथे चौरंगी लढत होत असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दामूअण्णा घोडे, शिवसेना ठाकरे गटाचे बाळासाहेब डांगे, शिवसेना शिंदे गटाचे सुभाष पोकळे अशी तगडी लढत रंगली हाेती. टाकळी हाजी गटात गावडे कुटुंबीयाची आरपारची लढाई होती. मात्र, मतदारांनी गावडे कुटुंबावर पुन्हा एकदा विश्वास ठेवत राजेंद्र गावडे यांना माेठ्या मताधिक्याने विजयी केले.
NCP’s first setback in Pune district, BJP’s Rajendra Gawde wins by3,385 votes
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक,