PM Modi : जिल्हा परिषद निवडणुकीत विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले महाराष्ट्रातील जनतेचे आभार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : PM Modi जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप व महायुतीला घवघवीत यश मिळाले असून भाजप पुन्हा एकदा नंबर वनचा पक्ष बनला आहे. या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.PM Modi

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले की, पुन्हा एकदा, महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमधील भाजप आणि महायुतीच्या घवघवीत यशानंतर, महाराष्ट्रातील जनतेने जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही आम्हांला भक्कम जनादेश दिला आहे. ग्रामीण असो वा शहरी, महाराष्ट्र राज्यातील जनतेला सुशासन आणि राज्याच्या गौरवशाली संस्कृतीचा आदर करणारे युतीचे सरकार हवे आहे, हे यावरून स्पष्ट होते.PM Modi



 

मी महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनींचे आभार मानतो. ​महाराष्ट्र सरकारच्या ठोस कामगिरीबद्दल तसेच एनडीएच्या सुशासनाच्या दृष्टिकोनाबद्दल जनतेपर्यंत माहिती पोहोचवत, स्थानिक स्तरावर अथक परिश्रम करणाऱ्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.

https://twitter.com/narendramodi/status/2020876762226491609

भाजप व महायुतीला घवघवीत यश मिळाले असून भाजप पुन्हा एकदा नंबर वनचा पक्ष बनला आहे. या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

PM Modi Thanks Maharashtra Voters After BJP’s Zilla Parishad Election Victory

महत्वाच्या बातम्या