विशेष प्रतिनिधी
मुंबई : अखेर मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्यांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण होण्याची शक्यता आहे.Prabhakar Shinde
यासोबतच शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या राजश्री शिरवाडकर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. तर सुधार समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या संध्या दोषी आणि बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. हे तिघेही लवकरच आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.Prabhakar Shinde
या घोषणेमुळे भाजप-शिवसेना महायुतीत वैधानिक समित्यांचे वाटप स्पष्ट झाले आहे. स्थायी समिती आणि शिक्षण समिती या दोन महत्त्वाच्या समित्या भाजपकडे गेल्या असून, सुधार आणि बेस्ट समितीची धुरा शिवसेनेकडे सोपवण्यात आली आहे.Prabhakar Shinde
स्थायी समिती ही महापालिकेतील सर्वात प्रभावशाली आर्थिक समिती मानली जाते. विकासकामे, निविदा आणि आर्थिक मंजुरी यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांवर या समितीचा अंतिम शिक्का असतो. त्यामुळे या समितीच्या अध्यक्षपदाकडे विशेष लक्ष लागले होते.Prabhakar Shinde
Prabhakar Shinde Named Mumbai Standing Committee Chairman; Education to BJP, City Improvement and BEST to Shiv Sena
महत्वाच्या बातम्या
- स्वीकृत सदस्य म्हणजे काय? महानगरपालिका स्वीकृत सदस्यांची निवड कशी केली जाते?
- अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानातील नाेंदणी साधनांचे आगीमुळे नुकसान, तपास यंत्रणेकडून प्रथमच अधिकृत माहिती
- खारगे समितीची पार्थ पवार यांना क्लिन चिट, राज्यसभेवर जाण्याचा मार्ग माेकळा
- Chief Minister : शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा बहाल करण्यास मुख्यमंत्र्यांची स्थगिती