विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sunetra Pawar दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. वरळी डोम येथे पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय झाला असून प्रफुल्ल पटेल यांनी याबाबतची घोषणा केली.Sunetra Pawar
अजितदादांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून निघणे शक्यच नाही. आपल्या सगळ्यांच्या मनात एकच नाव आहे – अजितदादा, असे म्हणताना सुनेत्रा पवार भावुक झाल्या.Sunetra Pawar
प्रफुल्ल पटेल म्हणाले, अजितदादा एक महान नेते होते. त्यांच्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला वेगळी ओळख मिळाली. अजितदादा सामान्य नेता नव्हते. अजितदादा यांच्या नेतृत्वात पक्षाने नवीन ऊंची गाठली. अजित दादा फार मोठा नेता होता. सामान्य लोकांचे, शेतकऱ्यांचे तसेच तरुणांचे नेते होते. लाडक्या बहिणींना वाटायला लागले होते की आमचा हक्काचा भाऊ म्हणजे अजितदादा आहे. पण अचानक 28 जानेवारीच्या दिवशी ते आपल्यातून निघून गेले. हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय दुःखद घटना होती.
पुढे बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, अजितदादा नहेमी म्हणायचे की आपण कोणसोबतही गेलो तरी आपले विचार हे शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे असणार. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवड केली असल्याची घोषणा केली. तसेच यावेळी त्यांनी सर्व आमदारांचे व नेत्यांचे आभार मानले.
सुनील तटकरे म्हणाले, महाराष्ट्रात एक वेगळा आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बनल्या आहेत. हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. अजितदादा सारख्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो. पक्षाच्या उभारणीत दादांचे योगदान फार मोठे राहिले आहे. त्यांनी सगळ्यांच्या भावनांचा विचार केला. भुजबळ साहेब साक्षीदार आहेत, 2004 साली क्रमांक एकचा पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस झाला आणि हे केवळ अजितदादांमुळे झाले.
पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, अजित पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. पण त्यांच्या पाठीशी सुनेत्रा वहिनी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांना मनस्ताप सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाला होता. दादांवर अनेकांनी आरोप केले. या काळात सुनेत्रा वहिनी यांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली, असेही तटकरे म्हणाले. एक खंत दादांच्या मनात नेहमी राहिली. राज्यात आपले सरकार, दादा उपमुख्यमंत्री. दादा, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या एसीबीची खुली चौकशी करण्याचा आदेश तेव्हा दिला गेला याचे दुःख दादा आयुष्यभर कधी विसरू शकले नाहीत.
छगन भुजबळ म्हणाले, खरे म्हणजे आपली कुठली सभा असेल, तर प्रत्येक सभेत अजितदादा त्यांचे कर्तुत्व आणि त्यांना झालेला अपघात याचे प्रत्येकजण वर्णन करत असतो. दूसरा विषयच नसतो आणि हे स्वाभाविक आहे. अजितदादांच्या विमानाचा स्फोट बारामतीमध्ये झाला, परंतु हादरे संपूर्ण महाराष्ट्रात बसले. लोक स्तब्ध झाले. असे कसे होऊ शकते, कालच तर ते सोबत होते, असे कसे काय झाले? असे प्रश्न अनेकांना पडले.