विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar Faction अहिल्यानगर येथील जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती आणि सभागृहाच्या सदस्यांविषयी कथितपणे आक्षेपार्ह विधान केले होते. सूर्यकांत मोरे यांच्या विधानाप्रकरणी भाजप गटनेते प्रवीण दरेकर आणि आमदार श्रीकांत भारतीय यांनी 9 डिसेंबर 2025 रोजी विधान परिषदेत हक्कभंग दाखल केला होता. दरम्यान, आज (10 मार्च) विधान परिषद विशेषाधिकार समितीचा प्रकरणासंदर्भातील अहवाल प्रसाद लाड यांनी सादर करताना कारावासाची शिक्षा देण्याची शिफारस केली आहे.Sharad Pawar Faction
विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी सूर्यकांत मोरे यांच्या हक्कभंगासंदर्भातील 167 पानांचा अहवाल आज सभागृहात सादर केला. यावेळी प्रसाद लाड यांनी सांगितले की, दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी जामखेड येथील नगरपरिषद निवडणुकीच्या भाषणात सूर्यकांत मोरे यांनी विधान परिषद, सभागृहाची रचना, कायदेनिर्मिती प्रक्रिया आणि सभापती यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यांच्या विधानासंदर्भात प्रवीण दरेकर आणि श्रीकांत भारतीय यांनी हक्कभंगाची मागणी केली होती. त्यानंतर दि. 9 डिसेंबर 2025 रोजी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले होते. समितीने 6 बैठका घेऊन या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला असून यासंदर्भातील अहवाल आज सभागृहात सादर करत आहे.
Action Taken Against Sharad Pawar Faction Leader Over Objectionable Remarks on Legislative Council Chairman and Members
महत्वाच्या बातम्या
- पिंकी माळीच्या कुटुंबाला व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही. के. सिंगकडून धमक्या, अमाेल मिटकरी यांचा आरोप
- निलंबित आयएएस अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी, निलंबन मागे घेण्याची शक्यता
- राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांवर ब्रेक, सरकारचा मोठा निर्णय
- पाकिस्तान जिंदाबादच्या घाेषणा, पाेलीसांच्या कारवाईनंतर भारत माता की जय म्हणत माफी