विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात एका तरुणाने “पाकिस्तान जिंदाबाद” अशी घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात मोठा वाद निर्माण झाला हाेता. अनेकांनी संताप व्यक्त करत संबंधित तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिस कारवाईनंतर संबंधित तरुणाने आपल्या चुकीची कबुली दिली. “माझ्याकडून चूक झाली आहे, मला माफ करा. मला देखील भारतावर प्रेम आहे,” असे म्हणत त्याने “भारत माता की जय” अशी घोषणा देत घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. Pakistan Zindabad
सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण “चल, पाकिस्तान जिंदाबाद… काय करायचं ते कर… हिंदुस्तान जिंदाबाद नाही म्हणत” असे बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर झाल्यानंतर पुण्यात वातावरण तापले. . या प्रकाराच्या निषेधार्थ काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करत संबंधित तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान व्हिडिओमधील तरुणाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. अमन मुल्ला असे या तरुणाचे नाव असून तो सुमारे २० वर्षांचा आहे. तो फॅब्रिकेशनचे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.काही दिवसांपूर्वी पौड परिसरात एका ठिकाणी काम करत असताना अमन मुल्लाने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका सहकाऱ्याने हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झाला.
पर्वती पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित तरुणाचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिली.
After the declaration of Pakistan Zindabad, the police action, they apologized by saying Bharat Mata Ki Jai
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेणार; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- Kalakar Katta : गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ वादात नवे वळण; वाहतूक अडथळ्याची अधिकृत नोंदच नाही
- उद्योगपती अनिल अंबानीच्या संबंधित कंपनीवर 15 ठिकाणी ईडीचे छापेमारी
- साेशल मीडियावर व्हायरल वक्तव्य प्रकरणी वसंत माेरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा