विशेष प्रतिनिधी
मुंबई: Mungantiwar जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? हवेत का बोलत आहात. मी व्यवस्था करतो फोन करायला, देवेंद्रजींना सांगून फ्री टेलिफोनची व्यवस्था करायला सांगतो, असा टोला भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना लगावला.Mungantiwar
जय पवार यांच्या पत्रकार परिषदेवर रोहित पवार यांनी भाजपचा दबाव आहे का, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन, मुनगंटीवार यांनी रोहित पवारांवर पलटवार केला. ते म्हणाले,विमान अपघाताची चौकशी व्हायला पाहिजे का? तर होत आहे. शंका का घेत आहेत, तुमच्या काकी आहेत, त्या पण मदत करतील ना. पत्रकार परिषद घेणार होता बेटा, का नाही घेतली एकदा विचार तर ना? Mungantiwar
एफआयआरचा विषय आहे, बारामतीची घटना आहे तिथे एफआयआर करा, झिरोमध्ये दाखल केला आणि बारामतीला पाठवला. अतिविशिष्ट कारण असेल तर एफआयआर घेतला जातो, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.
आमच्या नेत्याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण केले जात आहे. प्रफुल्ल पटेल कुणाच्या लग्नात गेले याचा फोटो ट्विट केला जातो. ट्विटद्वारे आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो आणि आपलेच तेवढे कसे प्रेम आहे, हे दाखवलं जातंय, असे म्हणत नाव न घेता रोहित पवारांना लक्ष्य केलं. याप्रकरणाची चौकशी लवकर होऊन सत्य बाहेर यायला पाहिजे, असेही अनिल पाटील यांनी म्हटले.
Why Speak Without Facts? Phone Jay Pawar: Mungantiwar Targets Rohit Pawar
महत्वाच्या बातम्या
- आंतरराष्ट्रीय युद्धाचा फटका शहरातील वसतिगृहांपर्यंत; गॅस टंचाईमुळे चुलीवर स्वयंपाक
- गोकुळ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; 1200 सभासदांच्या पात्रतेवर सुनावणी
- एलपीजी गॅस दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन
- महाराष्ट्र वेगळे राष्ट्र असते तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये 30 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन