विशेष प्रतिनिधी
पुणे: अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 58 व्हिडिओ आहेत. म्हणजे 58 महिलांवर अत्याचार झाला आहे का? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पदापदावरून पायउतार झाले पाहिजे. त्याशिवाय या प्रकरणाचा तपास पूर्ण होणार नाही. रूपाली चाकणकर त्या पदावर राहिल्या तर पुरावा नष्ट करतील असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केला.
रूपाली ठोंबरे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, हा विषय कोणत्या पक्षाचा, जातीचा नाही तर हा विषय महिलांचा आहे. 1 वर्षापूर्वी या प्रकरणाची वाचा फोडली होती. ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली निलेश चाकणकर आहेत. त्यामुळे पोलिस कारवाई करत नव्हते का?
रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, सर्व ट्रस्टवर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. जर रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिला नाही तर संपूर्ण राज्यभर आंदोलन करणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या कानावर हा विषय टाकणार आहे. संविधानिक पदावर असल्यामुळे, तपास योग्य होणार नाही, त्यांनी रुपाली चाकणकर यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, असे देखील त्यांनी म्हटले.
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाणे येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून, त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. बुधवार, 18 मार्च रोजी पहाटे सुमारे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक खरात याला ताब्यात घेतले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला असून, गेल्या काही वर्षांत ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून त्याने नाव कमावले होते.
“58 Videos, 58 Victims?” Demand for Rupali Chakankar’s Resignation Grows
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास