विशेष प्रतिनिधी
नाशिक : Ashok Kharat महिलेवरील अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातविरोधात धक्कादायक माहिती समोर येत असून, आता आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. गरोदरपणातील पूजाविधी करण्याचे कारण देत एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.Ashok Kharat
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे ईशानेश्वर मंदिर स्थापून आणि मंत्र-तंत्राच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन करत होता. विविध अडचणींवर उपाय सांगण्याच्या नावाखाली तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचे उघड झाले आहे.Ashok Kharat
ही घटना २१ नोव्हेंबर २०२३ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत कॅनडा कॉर्नर परिसरातील त्याच्या कार्यालयात घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. पीडित महिलेच्या पतीने पुढे येत तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
तक्रारीनुसार, गरोदरपणातील विधी करण्यासाठी महिलेला बोलावून खरातने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास पतीसह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, खरात महिलांना गुंगीकारक पदार्थ देत असे आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. याआधीच्या प्रकरणातही त्याने स्वतःला “कृष्णाचा अवतार” असल्याचे सांगत एका महिलेला फसवून अत्याचार केल्याचे उघड झाले होते.
या नव्या गुन्ह्यानंतर शहर पोलिसांनी खरातला पुन्हा ताब्यात घेतले असून, गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Another Case Filed Against ‘Godman’ Ashok Kharat in Nashik; Accused of Assaulting Pregnant Woman
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास