अशोक खरात प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अशोक खरात प्रकरणात कोणालाही सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. Devendra Fadnavis

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे. अशोक खरातच्या संदर्भात जो विषय घडलेला आहे तो अतिशय गंभीर आहे. या व्यक्तीने आपल्या तथाकथित शक्तींचा दुरुपयोग करून अनेक महिलांसोबत दुष्कृत्य केले आहे. या संदर्भातील कारवाई आपल्या पोलिसांनी केली आहे. याचा ट्रॅप तयार करून केली आहे. यात महिला देखील असल्याने त्या समोर यायला तयार नव्हत्या. त्यांची फसवणूक झाली आहे. त्यांना धीर दिल्यानंतर महिला तक्रारी करत आहेत. कारवाई जारी आत्ता झाली असली तरी तयारी आधीपासून सुरू होती.



आपण नोटीस काढून ठेवली होती, त्याला बाहेर पळून जाता येणार नाही, अशी व्यवस्था करून ठेवली होती. हा महिलांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. आपल्याकडे वेगळ्या शक्ती असल्याचे भासवून महिलांची फसवणूक केली गेली. याचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्या याचे सखोल निवेदन मी करेल. तसेच मी नेहमीच क्लीनचिट देत नाही. जो क्लीन आहे त्यालाच चिट देतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

भास्कर जाधव म्हणाले, सरकार कुठल्याही विषयाच्या शेवटाकडे जण्याआधीच स्टेटमेंट करते. त्यामुळे प्रकरणाच्या शेवटाकडे जाताच येत नाही. पुरोगामी महाराष्ट्र म्हणता, त्या बुवाचे पाय धुता? लाज वाटली पाहिजे. अशोक खरातचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर कारवाई सुरू असल्याचे सांगत यावर अधिक चर्चा करणे योग्य नसल्याचे म्हटले.

सभागृहात बोलताना कॉंग्रेस नेते नाना पटोले म्हणाले, अशोक खरातसोबत ज्यांचे ज्यांचे फोटो आले आहेत त्यांनी राजीनामा द्यावा. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. इतरांचे देखील राजीनामे घेतले पाहिजे.

No One Will Be Spared in Ashok Kharat Case,” Warns CM Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या