पुण्यात वसंत मोरेंना मोठा झटका; अटकपूर्व जामीन फेटाळला, मोरेंना अटक होणार?

विशेष प्रतिनिधी

पुणे: शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना पुणे जिल्हा न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. अँट्रोसिटी अॅक्टअंतर्गत दाखल गुन्ह्यात त्यांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात गंभीर आरोपांचा विचार करत न्यायालयाने हा निर्णय दिला. अँट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे गंभीर स्वरूपाचे मानले जात असल्याने अशा प्रकरणांमध्ये अटकपूर्व जामीन मिळवणे कठीण ठरते. याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने मोरे यांचा अर्ज नामंजूर केल्याचे सांगितले जात आहे.



अटकपूर्व जामीन फेटाळला

अधिक माहितीनुसार,या प्रकरणातून मुक्तता होण्यासाठी वसंत मोरे यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत वसंत मोरेंचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.

वसंत मोरेंना कोणत्याही क्षणी अटक होणार?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष अविनाश विश्वनाथ लहाडे यांनी वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अविनाश लहाडे यांनी त्यांचे वडील विश्वनाथ लहाडे यांच्याबद्दल वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. हे संदर्भात शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Vasant More suffers a major setback in Pune; Anticipatory bail rejected, will More be arrested?

महत्वाच्या बातम्या