विशेष प्रतिनिधी
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षावर ताबा मिळवायचा होता. त्यासाठी ब्लॅकमॅजीक करण्यात आले. हा सगळा कट रचला गेला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केला आहे.
विधिमंडळ परिसरात पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले, अजितदादा जीवंत असताना त्यांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केले जाते. कदाचित नाशिकचाच जो भोंदूबाबा आहे तिथे काळी जादू करण्याचा प्रयत्न होतो. याच्यामागे कारण म्हणजे पक्षावर ताबा मिळावा असे होते का? त्यानंतर 28 तारखेला अजितदादांचा अपघात झाला की घातपात झाला हे आम्ही शोधत आहोतच. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे दोन दिवसात पीयूष गोयल यांचे स्टेटमेंट येते की, प्रफुल्ल पटेल हे अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. नंतर ते म्हणाले की मी चुकून बोललो. पण क्रमवारी बघितले तर असे दिसते की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर पक्षाच्या नेत्यांमध्ये या गोष्टी आधीच ठरल्या होत्या. हे आधीच ठरले होते की पक्षाचा कंट्रोल घ्यायचा आहे, तर मग जेव्हा अजितदादांची अंत्यविधी होत होती तेव्हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तिथे आले. काय हेतू घेऊन तिथे आले होते? त्याच्यामागे 27 तारखेच्या बैठकीचा देखील काय हेतू होता? या सगळ्या गोष्टीचा तपास केला गेला पाहिजे.
- तालिका सभापती परिस्थिती बघून निर्देश देऊ शकतात, पण ते ब्रह्मवाक्य नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
रोहित पवार म्हणाले, हे सगळे डॉक्युमेंट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून मी समोर आणेलच. पण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षाचा ताबा घ्यायचा होता. कारण अजितदादा असताना जे फालतू खर्च होते, नरेश आरोरावरचा खर्च असेल, इतर काही खर्च असतील, काही गोष्टी पक्षात चुकीच्या होत होत्या. काही लोकांचे कर्तुत्व नसतानाही मोठी मोठी पदे देण्यात आली होती. दादा कार्यकर्त्यांचे, आमदारांचे ऐकत होते. पण या लोकांचे ऐकत नसल्यामुळे मग या लोकांनाच असे पाहिजे होते का की संपूर्ण पार्टीच आपल्या हाती यावी. आणि मग अजितदादांचा अपघात होणे, पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणे आणि सुनेत्रा काकींना हे सगळे कळणे.. आता सुनेत्रा काकींना एवढेच मला सांगायचे आहे की, राजकारण लय वंगाळ झालेले आहे. अवतीभवती जी लोक आहेत, त्यांची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार हे आपल्यासाठी महत्त्वाचा आहे.
अधिवेशनात अजितदादांच्या अपघातावर एक दोन आमदार सोडले तर कोणीच चर्चा केली नाही. कारण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते की अजिबात अजितदादांच्या अपघातावर तिथे बोलायचे नाही. जय पवार सुद्धा पत्रकार परिषद घेणार होते. ते काही नाही झाले? जय लढणारा आहे, शेवटी पवार आहे, मराठी माणूस आहे. पण त्याचा आवाज दाबण्याचा कोणी प्रयत्न करत आहे का? हा सगळा कट आधीच रचला होता का? त्यामुळे यात क्रिमिनल इन्वेस्टिगेशन झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. आता आमचा एफआयआर दाखल झाला आहे कर्नाटकात. त्यांनी महाराष्ट्र पोलिसांकडे हा तपास सोपवला आहे.
‘Black Magic’ Plot to Control NCP: Rohit Pawar Targets Praful Patel, Sunil Tatkare
महत्वाच्या बातम्या