विशेष प्रतिनिधी
पुणे : ऋषीकेश वैद्य या भोंदू बाबाला पोलिसांनी पिंपरी येथून अटक केली आहे. महिलेला फसवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तो फरार होता. Rishikesh Vaidya
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर राज्यात भोंदू बाबांच्या कारवायांची चर्चा सुरू असताना पुण्यातील हा प्रकार समोर आला आहे. एका ३५ वर्षीय महिलेने वैद्यविरोधात माणिकपूर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती. नंतर हा गुन्हा हडपसर पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला. Rishikesh Vaidya
- तालिका सभापती परिस्थिती बघून निर्देश देऊ शकतात, पण ते ब्रह्मवाक्य नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
तक्रारीनुसार, २०२३ मध्ये सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर वैद्यने स्वतःला भगवान शंकराचा मोठा भक्त असल्याचे सांगत पीडितेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मांजरी परिसरातील एका लॉजवर नेऊन गुंगीकारक पदार्थ देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पीडितेने पोलिसांत धाव घेतली. गुन्हा दाखल झाल्यानंतर वैद्य फरार झाला होता. मात्र तो पिंपरी परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Fake Godman Rishikesh Vaidya Arrested in Pimpri
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर