विशेष प्रतिनिधी
नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदू अशोक खरातवर शुक्रवारी रात्री उशिरा आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. यापैकी एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा, तर दुसरा आर्थिक फसवणुकीचा आहे. नवऱ्यासोबत संसार सुखाचा व्हावा म्हणून आलेल्या महिलेवर खरातने लैंगिक अत्याचार केला. Ashok Kharat
या प्रकरणातील दांपत्याचे 2013 साली लग्न झाले. पण त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते. त्यामुळे ते विभक्त राहत होते. एका व्यक्तीच्या सूचनेनुसार ते आपला संसारगाडा रुळावर आणण्यासाठी भोंदू अशोक खरातकडे गेले होते. 2022 साली हे दोघे पहिल्यांदा त्याच्याकडे गेले. त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा ते अशोक खरात याच्याकडे गेले. त्यावेळी खरातने पतीला केबिनबाहेर बसवले. त्यानंर पत्नीला तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायला देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच यावेळी त्याने तिला ठार मारण्याचीही धमकी दिली.
- तालिका सभापती परिस्थिती बघून निर्देश देऊ शकतात, पण ते ब्रह्मवाक्य नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
तू ही गोष्ट कुणाला सांगितली तर मी महादेवाचा अवतार आहे. माझ्याकडे दैवी शक्ती आहे. मी तुझ्या मुलांना मारून टाकून तुझा संसार उद्ध्वस्त करेन असे खरात म्हणाला होता, असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तत्पूर्वी, हे दोघे 2022 मध्ये पहिल्यांदा अशोक खरातकडे गेले होते, तेव्हा त्याने या दोघांना त्यांच्या लग्नाची तारीख विचारली होती. त्यांनी लग्नाची तारीख सांगितल्यानंतर तुमचे लग्न चुकीच्या तारखेला झाल्यामुळे तुमच्यात सातत्याने वाद झाल्याची बतावणी त्याने केली होती. त्यानंतर हे दोघे जवळपास 6-7 वेळा त्याच्याकडे गेले होते.
Ashok Kharat Booked in Two More Cases Including Rape Charges
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर