विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune हडपसर परिसरातील उषाकिरण रुग्णालयात टायमर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याच्या घटनेला आता नवे वळण मिळाले असून, या प्रकरणातील संशयित व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित संशयित ओला इलेक्ट्रिक दुचाकीवरून रुग्णालयात आल्याचे फुटेजमध्ये दिसून आले असून, त्यानेच ही वस्तू ठेवली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.Pune
हडपसर परिसरातील उषाकिरण रुग्णालयाबाहेर बॉम्बसदृश्य संशयित वस्तू आढळल्याने मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन, बॉम्बशोधक व नाशक पथक, डॉग स्क्वॉड तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसर तातडीने पोलिसांनी ताब्यात घेत तपास सुरू केला.Pune
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उषा किरण रुग्णालयाजवळ एक संशयास्पद वस्तू आढळून आली. ती वस्तू दिसायला बॉम्बसारखी असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी रुग्णालय परिसर ‘कॉर्डन ऑफ’ करत तेथील ये-जा तात्पुरती बंद केली. नागरिक, रुग्ण आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला.
दरम्यान, बॉम्बशोधक व नाशक पथकाने अत्यंत सावधगिरीने संशयित वस्तू रुग्णालय परिसरातून हटवून एका मोकळ्या आणि सुरक्षित जागी हलवली. त्या ठिकाणी संबंधित वस्तूची सखोल तपासणी केली.
घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. तपासाचा भाग म्हणून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून संशयित वस्तू तेथे कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवली याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे.
Timer bomb-like object found at Pune’s Ushakiran Hospital; suspect caught on CCTV
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी