इंधन बचतीसाठी पुणे महापालिकेची काटकसर; वाहन वापरांवर लागणार निर्बंध

विशेष प्रतिनिधी

पुणे: देशात इंधन टंचाईच्या संकेत मिळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचतीवर भर देण्याचे आवाहन केले आहे.या पार्श्वभूमीवर,पुणे महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे.महापालिकेकडून वाहनांच्या वापर ३० टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, इंधन बचतीसाठी सर्वच विभागांना सूचना देण्यात येणार आहेत.अधिकाऱ्यांनी स्वतःच्या वाहनाचा वापर वापर कमी करून सार्वजनिक वाहन वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.महत्वाच म्हणजे,मेट्रोजवळ राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी मेट्रोचा वापर करावा अशा सूचना महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणार आहेत.



महापौर मंजुषा नागपुरे यांनी देखील इंधन बचतीसाठी महापालिकेत आठवड्यातून एक दिवस ‘ सार्वजनिक वाहतूक दिन ‘ पाळण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.यादिवशी अधिकारी बस आणि मेट्रोचा वापर करतील असे सांगण्यात येत आहे.

महापालिकेकडे किती वाहनांचा ताफा?

पुणे महापालिकेकडे सध्या १३४२ वाहने उपलब्ध आहेत.त्यात जवळपास २०५ कार चा समावेश असून,इतर वाहने प्रशासकीय आणि नागरिकांच्या सुविधेसाठी वापरली जातात.महापौर,उपमहापौर, विरोधी नेते,स्थायी समिती अध्यक्ष्य यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाहनांची सुविधा आहे.

महापालिकेत वाहनांचा अनावश्यक वापर होऊ लागल्याने,वाहनांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण लागू केले जाणार असल्याचे सांगीतले जात आहे.

Pune Municipal Corporation’s frugality to save fuel; Restrictions on vehicle use

 

महत्वाच्या बातम्या